वाचा:
प्रांताधिकारी सचिन ढोले व वारकरी संत यांच्यात चर्चा होऊन मागण्याचे निवेदन शासनाला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. महाद्वार काल्यादिवशी संत नामदेवांचे वंशज व मदन महाराज हरिदास यांचेवर दाखल केलेला गुन्हा देखील मागे घेण्यास प्रशासनाने तयारी दाखवल्यानंतर तोडगा निघाला. वारकरी संप्रदायाच्या भावनांचा विचार होत नसल्याने व तात्काळ मागण्या मान्य होत नसल्याने ३ ऑगस्ट रोजी राज्यातील २९ जिल्ह्यांतून १ लाख वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होतील, असा इशारा विश्व वारकरी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथमहाराज देशमुख यांनी दिला होता. या आंदोलनाला राज्यातील अनेक वारकरी संघटनांसह वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष यांनीही पाठिंबा दिला होता. त्यामुळे सरकार पातळीवरून वेगाने हालचाली होऊन, वारकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला व तूर्त पुढील आंदोलन टळलं आहे.
वाचा:
या होत्या प्रमुख मागण्या…
१) संत नामदेव महाराजांच्या वंशजांवर महाद्वार काल्यादिवशी दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत.
२) गोकुळ अष्टमी पासून नियम अटी लावून ५० वारकऱ्यांना भजन व कीर्तन करण्यास परवानगी द्यावी.
३) महाराष्ट्रातील देवस्थाने अटी व नियम लावून उघडण्यात यावीत.
४) फू बाई फू या कार्यक्रमात कीर्तन सेवेचा अपमान करणाऱ्या कलाकारांवर गुन्हे दाखल करावेत.
५) लाऊड स्पीकरचा नियम मंदिर व मशिदीसाठी एकसारखा असावा
६) इंदोरीकर महाराजांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत.
…म्हणून वारकरी झाले आक्रमक
करोना संसर्गामुळे गेल्या चार महिन्यांपासून राज्यात लॉकडाऊन सुरू आहेत. याचा फटका सर्वांनाच बसल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात सध्या अनलॉक प्रक्रिया सुरू आहे. मिशन बिगिन अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मात्र, धार्मिक स्थळांना आणि सण-उत्सवांना तितकासा दिलासा मिळालेला नाही. यंदा आषाढी वारी प्रतिकात्मकरित्या साजरी करण्यात आली होती. आषाढी यात्रेदिवशी पंढरपुरात वारकऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. त्याशिवाय राज्यातील सर्व मंदिरे आजही बंद आहेत. भजन कीर्तनासही मनाई करण्यात आलेली आहे. या सगळ्याच मुद्द्यांवरून वारकरी संप्रदाय नाराज असून या नाराजीचा आता स्फोट होण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने सकारात्मक पावले टाकली आहेत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I love looking through a post that can make people think. Also, many thanks for permitting me to comment!
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
These are actually great ideas in concerning blogging.
Thanks so much for the blog post.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.