अयोध्या: अयोध्येत निर्माण होणाऱ्या राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आता एका आठवड्याहूनही कमी कालावधी उरला आहे. देशात करोनाचा कहर सुरू असल्यामुळे मंदिर ट्रस्टने आमंत्रित लोकांची संख्या २०० पर्यंतच मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला रामभक्तांनी गर्दी करू नये असे आवाहन ट्रस्टने केले आहे. असे असले तरी अयोध्येत गर्दी वाढणार असून करोनाच्या संक्रमणाचा धोका त्यामुळे वाढू शकतो असेही म्हटले जात आहे.

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये अयोध्येत करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. या बरोबरच अयोध्येत रुग्ण बरे होण्याचा दर देखील काहीसा कमी झालेला आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमापूर्वी रामलल्लाचे पुजारी प्रदीप दास यांना देखील करोनाची लागण झालेली आहे. या व्यतिरिक्त मंदिराचे संरक्षणासाठी तैनात असलेल्या १४ पोलिसांनाही करोनाची लागण झालेली आहे.

२९ जुलैपर्यंत जिल्ह्यात एकुण ९९३ करोनाचे रुग्ण होते. या रुग्णांपैकी १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ६०५ रुग्ण बरे झाले आहेत. हे आकडे मोठे वाटत नसले, तरी देखील कालबद्ध पद्धतीने त्यांचे विश्लेषण केल्यास अयोध्येचे चित्र वेगळे दिसते.

वाचा:

एका आठवड्यापूर्वी अयोध्येत ७०३ करोनाचे रुग्ण होते. यांपैकी ४८३ रुग्ण बरे झाले होते. सात दिवसांमध्ये अयोध्या जिल्ह्यात २९० रुग्णांची भर पडली. या दरम्यान १२२ लोकांना घरी सोडण्यात आले. अशा प्रकारे अयोध्येतील सक्रिय रुग्णांची संख्या वाढली. गेल्या आठवड्यात अयोध्येचा रुग्ण बरे होण्याचा दर ७३ टक्के इतका होता. त्यात घट होत या आठवड्यात तो ६८ टक्क्यांवर घसरला आहे.

वाचा:
गेल्या आठवड्यात अयोध्येत सरासरी दर दिवशी २१ नवे रुग्ण दाखल होत होते. मात्र, गेल्या आठवड्यात दररोज सरासरी ४४ नवे रुग्ण दाखल झाले आहेत. तसेच अयोध्येत दर १२ दिवसांनंतर रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. देशभरात २० दिवसांमध्ये रुग्ण दुप्पट होताना दिसत आहेत, तर अयोध्या जिल्ह्यात मात्र १५ दिवसांत रुग्ण दुप्पट होत आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here