बिहारः बिहारच्या मुजफ्फरपुर जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पत्नीला एक पेनड्राइव्ह सापडला, पेनड्राइव्ह तपासून पाहताच तिच्या पायाखालची जमिनच हादरली. पतीचे इतर तरुणींसोबत अश्लील व्हिडिओ पाहून महिलेने स्वतःचे आयुष्य संपवले आहे. महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

अजमत या महिलेचे जाहिर जावेद नावाच्या तरुणाशी एप्रिलमध्ये लग्न झालं होतं. जावेद मध्य प्रदेशमध्ये सिव्हिल इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. लग्नानंतर अजमतला त्याचे अनेक महिलांसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचं कळलं. त्यानंतर तिने त्याच्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी तिच्या हाती एक पेनड्राइव्ह लागला. त्यात जावेदचे अनेक महिलांसोबत अश्लील व्हिडिओ होते. याबाबत तिने त्याला जाब विचारल्यावर त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी अजमतच्या माहेरच्या लोकांनी त्यांच्यातील वाद सोडवण्यास मदत केली. ५ लाखांची गुंतवणूक करा, मॅच्युरिटीनंतर मिळतील ५० लाख; LICच्या या पॉलिसीबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
रविवारी दुपारी अजमत तिच्या माहेरी आली होती. त्याचवेळी तिने तिच्या आई-वडिलांना एटीएममधून पैसे काढण्याच्या बहाण्याने बाहेर पाठवले आणि आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने एक व्हिडिओ तयार केला होता. यात तिच्या हातात विषाची बाटली दिसत आहे. तुम्हाला मी नकोय ना, मी माझं आयुष्य संपवतेय. बस्स तुम्ही खुश राहा फक्त माझ्यासारखं दुसऱ्या कोणाला धोका देऊ नका, असं ती व्हिडिओत बोलताना दित आहे.

मद्यधुंद पोलिसाकडून १८ वर्षांच्या तरुणाला बेदम मारहाण; कुटुंबीयांचा आरोप, धक्कादायक कारण सांगितलं
अजमतने आत्महत्या केल्यानंतर तिच्या वडिलांनी जाहिर जावेदवर गंभीर आरोप केले आहेत. लग्नानंतर जाहिर आमच्या मुलीवर पाळत ठेवत होता. लग्नानंतर तो एकदाही तिला सासरी घेऊन गेला नाही. त्याने एके ठिकाणी भाड्याने खोली घेतली होती व तिला घेऊन तो तिथेच राहत होता. त्याने आम्हाला तो भोपाळमध्ये नोकरी करत असल्याचं सांगितलं होतं. मात्र, कित्येत दिवस तो इथे फिरकलादेखील नव्हता. त्याने आमच्या मुलीचं व्हॉट्सअॅप हॅक करुन ठेवलं होतं. जेव्हा आमची आमच्याशी बोलायची तेव्हा तो तिला मारहाण करायचा, असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here