वडिलांना दापोली येथील दवाखान्यात हलवण्यासाठी प्रयत्न केले. वाहन व एम्ब्युलन्स मिळेपर्यंत वेळ गेला रात्रीच्या सुमारास उपजिल्हारुग्णालयात दाखल करण्यात आले. उपजिल्हारुग्णालय दापोली येथील वैद्यकीय अधिकारी यांनी २२.३० वा.च्या सुमारास तपासून मृत्यू झाल्याचे घोषित केले.
राजेश गावडे याला दारूचे व्यसन होते त्यामुळेच दारूच्या नशेतच हे धक्कादायक टोकाचे पाऊल उचलत ही आत्महत्या केल्याने शिवनारी परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. राजेश गावडे त्याच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी,तीन मुले एक मुलगी असा मोठा परिवार आहे.
तालुका आरोग्य विभागाचा बेजबाबदारपणा
दरम्यान, ही दुर्देवी घटना काल घडल्यावर गावडे यांना उपजिल्हारुग्णालयात नेण्यात आले येथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. या सगळ्या प्रकरणाची नोंद दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शवविच्छेदन झाल्याशिवाय हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जात नाही. पण काल सोमवारी रात्रीपासून आज मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडुन शवविच्छेदन करण्यास डॉक्टरच वेळेत आले नाहीत त्यामुळे दुःखात असलेल्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा या तालुका आरोग्य विभागाच्या या प्रकारामुळे संताप व्यक्त होत आहे.
मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आंजर्ले येथील वैद्यकीय अधिकारी आल्यावर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या सगळ्या मृत्यू प्रकरणाची नोंद दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.
Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News