नवी दिल्ली : आजच्या काळात दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी किंवा संपत्ती निर्माण करण्यासाठी म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय म्हणून उदयास आला आहे. एसआयपी हा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा सर्वात लोकप्रिय मार्ग आहे. एसआयपीद्वारे गुंतवणूक करण्यासाठी म्युच्युअल फंड वितरक, बँका, मोबाईल ऍप्लिकेशन्स आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहेत. परंतु, गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड एसआयपीद्वारे पैसे काढताना किंवा रिडेम्प्शनच्या वेळी समस्यांना तोंड द्यावे लागते.

उदाहरणार्थ, एसआयपीमधून पैसे काढताना कोणते घटक लक्षात घेतले पाहिजेत. पैसे कधी काढले जावे आणि कोणत्या प्रकारचे कर आकारले जाऊ शकतात? तज्ज्ञांचे असे मत आहे की एसआयपीमधून अंशतः किंवा पूर्णपणे पैसे काढण्यापूर्वी आपण तरलतेची आवश्यकता, गुंतवणुकीचे उद्दिष्ट, कर दायित्व यासह अनेक बाबींचा विचार करायला हवा.

PPF vs Mutual Fund: कोण आधी बनवेल करोडपती? जाणून घ्या फायद्याचं गणित सोप्या भाषेत
तज्ज्ञांच्या मते कोणत्याही गुंतवणुकीतून पैसे काढताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या हव्या. उदाहरणार्थ, गुंतवणुकीचे उद्दिष्ट, मॅक्रो/बाजार परिस्थिती, एक्झिट लोड आणि कर दायित्व विचारात घेणे आवश्यक आहे.

रिडेम्पशनपूर्वी लॉक इन पीरियड तपासायला हवा. ELSS मध्ये 3 वर्षांचा लॉक-इन आहे. जर गुंतवणूक एसआयपीद्वारे केली गेली असेल, तर फक्त पहिली एसआयपी ३ वर्षांनी आणि दुसरी तीन वर्ष १ महिन्यानंतर काढता येऊ शकते. जर फंडचा परतावा चांगला सुरू असेल तर आणि पैशाची तत्काळ गरज नसेल, तर पहिल्या एसआयपीपासून ४ वर्षांनी एकरकमी पैसे काढले जावेत.

दर महिन्याला १० हजार गुंतवा, वयाच्या ४५व्या वर्षी व्हाल कोट्यधीश; वाचा कुठे, कशी इन्व्हेस्टमेंट कराल
एक्झिट लोड समजून घ्या
काही फंडांना ठराविक वेळेपूर्वी रिडीम केल्यास १% किंवा त्याहून अधिक एक्झिट लोड शुल्क भरावे लागते. इक्विटी फंडांच्या बाबतीत, वेळ फ्रेम सहसा एक वर्ष असते. म्हणजेच, गुंतवणुकीपासून एका वर्षापूर्वीच पैसे काढले असल्यास, एक्झिट लोड भरावा लागेल. जर पैशाची तातडीने गरज नसेल तर गुंतवणूकदारांनी एक्झिट लोड कालावधी संपण्यापूर्वी रिडीम करू नये.

भांडवली नफा कर किती असेल
कर आकारणीच्या दृष्टिकोनातून दीर्घकालीन भांडवली नफा मिळवणे चांगले आहे. जे इक्विटी फंडांसाठी १० टक्के (एक वर्षानंतर) आणि इंडेक्सेशन नंतर (३ वर्षानंतर) २० टक्के आहे. पैसे काढण्याच्या निर्णयासाठी कालावधी म्हणजे तुमचे ध्येय काय त्यानुसार ठरवणे.

छोटीशी बचत देईल लाखोंचा फंड; दर महिना किती करावी लागेल SIP? हे गुंतवणूक गणित जाणून घ्या
पैसे कसे काढता येईल
ऑफलाईन पद्धत –
म्युच्युअल फंड एसआयपीमधून रिडेम्प्शन ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे करता येते. ऑफलाइन मोडमध्ये, युनिट धारकाने एएमसीच्या नियुक्त कार्यालयात रीतसर स्वाक्षरी केलेला रिडम्शन विनंती अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यामध्ये युनिट होल्डचे नाव, फोलिओ क्रमांक, योजनेचे नाव, किती युनिट्स काढायचे आहेत. योजनेचा तपशील द्यावा लागेल. रिडम्शन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, रक्कम नोंदणीकृत बँक खात्यात जमा केली जाते.

ऑनलाईन पद्धत –
ऑनलाइन रिडेम्प्शनसाठी, युनिट धारकाला संबंधित म्युच्युअल फंडाच्या ‘ऑनलाइन व्यवहार’ पृष्ठावर लॉग इन करावे लागेल. फोलिओ क्रमांक किंवा पॅन वापरून लॉग-इन करा, त्यानंतर योजना आणि युनिट्सची संख्या (किंवा रक्कम) इत्यादी तपशील सबमिट करावा लागेल.
त्यानंतर रिडम्शन करता येईल. याशिवाय CAMS, Karvy सारख्या केंद्रीय सेवा प्रदाते विविध मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांकडून (AMCs) खरेदी केलेल्या म्युच्युअल फंडांची रिडम्शन सुविधा देतात. यासाठी तुम्ही ऑनलाइन फॉर्म डाउनलोड करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here