डोंबिवली: हल्ली सोशल मीडियावर अनेक जण हातात शस्त्र घेऊन भाई गिरीचे व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करत समाजामध्ये दहशत निर्माण करण्याचं काम करत असतात. मात्र प्रसिद्धी मिळवण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये व्हिडिओ तयार केलेल्या ठाकूर्लीमधील ‘रील’ स्टारला महागात पडले असून त्याला १८ महिन्यांकरिता तडीपार केले आहे. तडीपार केलेल्या ‘रील’ स्टारचे नाव सुरेंद्र पाटील उर्फ चौधरी आहे.

ठाकुर्ली परिसरात राहणारा सुरेंद्र पाटील उर्फ चौधरी याने आपल्या इंस्टाग्रामवर एक लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत. व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर, इंस्टाग्रामसाठी तो रीलवर व्हीडिओ बनवत असतो. ‘रानी नही हे तो क्या हुआ, ये बादशहा आज भी लाखो दिलो पे राज करता हे’ या डायलॉगचा एक व्हीडिओ त्याने काही महिन्यापूर्वी मानपाडा पोलीस स्थानकात केला होता. हातात बंदूक घेतलेला व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यामुळे एकच खळबळ माजली होती. त्यामुळे सुरेंद्र याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे होती. त्यानंतर सुरेंद्रने माफी मागितली मागत त्याचा हा व्हीडिओ व्हायरल केला. मात्र पोलिसांनी सुरेंद्र याला आता ठाणे, रायगड आणि मुंबई जिल्हातून तडीपार करत त्याच्याकडून बंदूक, ०५ जिवंत काडतूसे आणि ५५,०००/- मुद्देमाल जप्त केला आहे. सुरेंद्र याच्यावर ७ गुन्हे दाखल आहेत.

महिलेच्या हाती पेनड्राइव्ह लागला, पतीचे कारनामे पाहून हादरलीच; पत्नीने घेतला टोकाचा निर्णय
काय आहे घटना?

डोंबिवली पूर्वेतील मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्ह्यातील जप्त रक्कम परत करण्यासाठी ठाकुर्ली चोळे गावातील एका विकासकाला पोलिसांनी बोलविले होते. हा विकासक पोलीस ठाण्यात आल्यावर त्याने पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याच्या दालनात कोणी नाही पाहून, त्या अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसून स्वताचे छायाचित्रण करण्यास आपल्या मित्राला सांगितले. ते दबंगगिरीचे छायाचित्रण इन्स्टाग्राम, समाज माध्यमांवर प्रसारित करुन पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यावर या विकासकाने आपल्या महागड्या वाहनाच्या बाजुला समर्थकांना घेऊन जवळील परवानाधारी शस्त्र हातात घेऊन नाचगाणी सादर केली. समाज माध्यमांवर विकासकाच्या या दबंगगिरीचे छायाचित्रण प्रसारित होताच मानपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांनी त्याची गंभीर दखल घेतली.
५ लाखांची गुंतवणूक करा, मॅच्युरिटीनंतर मिळतील ५० लाख; LICच्या या पॉलिसीबद्दल जाणून घ्या सर्वकाही…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here