मिरा-भाईंदर : सासरच्यांनी नवविवाहित महिलेला माहेरून पैसे आणण्यासाठी छळ करत माहेरच्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने महिलेला ठार मारून, तिच्या आत्महत्येचा बनाव रचल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणी सासरच्यांविरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची ३ पथक रवाना केली आहेत.

एमसीएपर्यंत उच्च शिक्षण घेतलेली अस्मिता मिश्रा हिचे लग्न उत्तर प्रदेशातील अभय मिश्रासोबत अस्मिताचे वडील अमर मिश्रा यांनी २० नोव्हेंबर २०२१ रोजी मोठ्या थाटामाटात लावून दिले. काही दिवस लग्न संसार छान झाल्यानंतर मात्र अभय मिश्रा याच्या घरच्यांनी अस्मिताला घरून पैसे आणण्याचा तगादा लावला. पेशाने इंजिनिअर असलेला अस्मिताचा पती अभय हा मोठ्या बिल्डरकडे कामाला असल्याचे सांगून मुंबईतील जुहू इथे आपले आलिशान घर असल्याचे त्याने सांगितले होते. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे अस्मिताच्या लक्षात आल्यानंतर तिने सारी हकीकत आपल्या आईला सांगितली. त्यानंतर वडिलांनी तिला काही पैसे पाठवले. मात्र, तरीही सासरच्यांची पैशाची हाव संपली नाही.

तुझ्या मुलीला माझं नाव देईन, प्रेमात गुंतवून बँकर महिलेशी रोज संबंध ठेवले; लग्नाची वेळ येताच खरं रूप समोर…
पती अभय याला अस्मिताच्या वडिलांचे घर हवे होते. मात्र, घर मिळत नसल्याने आपण दुसरे लग्नदेखील करू शकतो असे सांगत अस्मिताला माहेरी सोडले. त्यावेळी लग्नकार्य दिलेले अस्मिताचे दागिने व सर्व वस्तू परत आणून देण्याची मागणी तिच्या वडिलांनी पती अभयकडे केली. यावेळी अभय याने सासर्‍यांची माफी मागितली व तो अस्मिताला पुन्हा सासरी घेऊन गेला. मात्र, त्यानंतर अस्मिता कधी पुन्हा माहेरी परतलीच नाही. अस्मिताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केला असून सासरच्यांनी छळ करून तिची हत्या केल्याचा आरोप अस्मिताच्या कुटुंबीयांनी केला आहे.

या प्रकरणी काशिमिरा पोलीस ठाण्यात अस्मिताचा पती अभय मिश्रा, सासरे मनीष मिश्रा, सासू प्रेमलता मिश्रा, दीर जयराज मिश्रा, नणंद पायल, पोर्णिमा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींच्या शोधासाठी तीन पथकं रवाना करण्यात आल्याचे काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांनी सांगितले.

लग्न करीन तर त्याच्यासोबतच, हट्टाला पेटली तरुणी; रागात बापाने लेकीसोबतच केलं भयंकर कृत्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here