रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने यापूर्वी रेपो दरात वाढ केली होती. त्यानंतर अनेक बँकांनी त्यांचे एमसीएलआर (MCLR) दर वाढवले आहेत. त्याचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. एमसीएलआरच्या वाढलेल्या दराचा थेट परिणाम कर्ज आणि ईएमआयवर होईल. आता लोकांना बँकांना ईएमआय देताना जास्त रक्कम मोजावी लागणार लागणार आहे.
एलपीजी आणि सीएनजीच्या किमतीत होऊ शकतेवाढ
एलपीजी, सीएनजी आणि पीएनजी दर महिन्याच्या १ तारखेला बदलतात. गेल्या महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पण देशात ज्या प्रकारे महागाई वाढत आहे, त्यानुसार पाहता गेल्या काही दिवसांपासून अनेक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत मार्चमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सर्वसामान्यांच्या खिशावरचा ताण अधिक वाढणार आहे.
ट्रेनच्या वेळेत होणार बदल
फेब्रुवारी महिना सरत असताना आता उन्हाळा सुरू झाला आहे. हवामानातील बदलामुळे आता रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल करू शकते. मार्चमध्ये रेल्वे प्रवासी आणि मालगाड्यांच्या वेळेत बदल करण्याची शक्यता आहे.
बँका किती दिवस बंद
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या कॅलेंडरनुसार, मार्चमध्ये खाजगी आणि सरकारी बँका १२ दिवस बंद राहतील. देशातील बँका महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी सुरू असतात, तर दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते.
सोशल मीडियाशी संबंधित नियम बदलणार
मार्च महिन्यात सोशल मीडिया वापरणाऱ्यांसाठी काही बदल होऊ शकतात. भारत सरकारने अलीकडेच आयटी नियमांमध्ये बदल केले आहेत. ट्विटर, फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आता भारतात नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे.