मुंबई : तिला अशी हत्या करायची होती की ज्यामध्ये ती हत्या न वाटता एक सामान्य मृत्यू वाटेल. तिने तशीच हत्या केली ज्याची कोणी कल्पनाही करू शकणार नाही. त्यामुळे सुरुवातीला ही फक्त सामान्य हत्येची घटना वाटली. पण तपासात एक-एक भयंकर सत्य समोर आलं. एका इसमाच्या अचानक पोटात दुखू लागलं. त्याला रुग्णालयात दाखल केलं. त्याच्या हृदयाच्या ठोक्यांपासून ते प्रत्येक अवयवांची चाचणी केली आणि लक्षात आलं की अचानक त्याचे संपूर्ण अवयव निकामी झाले आहेत आणि एक दिवस अचानक त्याचा मृत्यू झाला. पण हा मृत्यू सामान्य नव्हता. याच्यामागे एक मोठं कट कारस्थान समोर आलं आहे.

भयंकर म्हणजे हा खून खेळ इसमाच्या पत्नीनेच खेळला होता. हैवानियत भरलेल्या या महिलेने ७ महिन्यांपर्यंत हत्येचा कट रचला आणि २ महिने सतत पतीचा जीव घेत राहिली. अखेर तिच्या या कारस्थानामध्ये पतीची हत्या करण्यामध्ये यशस्वी झाली. पण सत्य हे कधीही लपून राहत नाही. अशाच प्रकारे धक्कादायक पद्धतीने या हत्येचा उलगडा झाला. क्राइम डायरी या कहाणीमध्ये मुंबईच्या सांताक्रुजमधील बिझनेसमॅनच्या हत्येची.

Kajal shah and Lover Hitesh

Crime Diary : नदीतून निघाले एकामागे एक मृतदेह, पोलिसांना वाटली आत्महत्या; तपासात उलगडलं ७ जणांच्या हत्येचं गूढ

सौभाग्यवतीचं वरदान मागणारी २ महिने पतीला जीवे मारत होती…

मुंबईचा सांताक्रुज परिसर. यामध्ये कमलाकांत शहा त्यांची पत्नी काजल शहा आणि दोन मुलं राहतात. शहा यांची आई देखील त्यांच्यासोबत राहायची. परंतु, एका गंभीर आजाराने त्यांचा मृत्यू झाला. ते एका गारमेंट कंपनीचे बिजनेस करता. गेल्या काही वर्षांपासून पत्नी आणि शहा यांच्यामध्ये वाद सुरू होता. त्यामुळे त्यांची पत्नी घर सोडून दोन्ही मुलांना घेऊन माहेरी निघून गेली होती. परंतु २०२२ मध्ये ती पुन्हा पतीकडे राहायला आली. खरंतर, दोघांमधील नातं काही ठीक नव्हतं. पण दोन्ही मुलांच्या आयुष्यासाठी आणि त्यांना चांगलं जीवन देण्यासाठी दोघे एकत्र आले.

सगळं काही ठीक सुरू होतं. पण २४ ऑगस्ट २०२२ ला कमलकांत यांच्या पोटात अचानक दुखायला लागलं. त्यांना उलट्याही झाल्या. यानंतर त्यांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेतला. औषधं घेतली, परंतु त्यांना आराम मिळाला नाही. वेदना इतक्या वाढत होत्या की शहा यांना असह्य होत होतं. त्यांनी अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला. अनेक रुग्णालयात चाचण्या केल्या. परंतु, त्यांना आराम मिळाला नाही. अखेर डॉक्टरांनी त्यांच्या मेडिकल चाचण्या केल्या. त्यांचे रक्त तपासलं, त्यांच्या अवयवांच्या चाचण्या केल्या आणि धक्कादायक माहिती डॉक्टरांच्या हाती लागली. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच १९ सप्टेंबरला कमलाकांत शहा यांचा मृत्यू झाला.

मां-बाप और बेटी तीनों ने क्यों चुना फांसी का फंदा? कोलकाता में ट्रिपल सुसाइड से हड़कंप

सायलेंट पॉयझन देऊन पतीची हत्या…

डॉक्टरांनी जेव्हा कमलकांत शहा यांच्या रक्ताची तपासणी केली. तेव्हा त्यांच्या शरीरात धातूचं प्रमाण हे सामान्य पेक्षा जास्त असल्याचं समोर आलं आहे. १३ सप्टेंबर रोजी हा रिपोर्ट करण्यात आला होता. त्यामध्ये लक्षात आलं की कमलकांत शहा यांच्या रक्तामध्ये आर्सेनिक (Arsenic) चं प्रमाण ४०० हून अधिक आहे आणि थैलियम (Thallium) चं प्रमाण ३६५ हून अधिक आहे. धातूचं एवढं मोठं प्रमाण शरीरात असणं म्हणजे शरीरात विष असणं आहे. खरंतर, हे दोन्हीही सायलेंट पॉयझन आहे. यानंतर शहा यांचा मृत्यू झाला नसून त्यांची हत्या झाली असल्याची शंका डॉक्टरांनी आली आणि याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

मुंबईच्या क्राईम ब्रांचने या घटनेचा तपास सुरू केला. सुरुवातीला कमलकांत शहा यांचा नेमका मृत्यू कसा झाला असेल, यावर काही पुरावे पोलिसांच्या हाती लागले नाही. यानंतर या प्रकरणांमध्ये शहा यांची बहीण समोर आली. तिने पोलिसांशी संपर्क साधून महत्त्वाची माहिती दिली. जेव्हा शहा यांच्यावर उपचार सुरू होता, तेव्हा काजल वारंवार पैशांची चौकशी करत होता आणि तिच्या चेहऱ्यावर कुठल्याही काळजीचा भाव दिसला नाही असं तिने पोलिसांना सांगितलं. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली. त्यांनी पत्नी काजल हिच्या लाईफ इन्शुरन्सबद्दल माहिती घेतली.

Crime Diary: ८० एन्काऊंटर, अरुण गवळीचे शार्प शूटरही मारले; शहीद विजय साळसकर यांची Unread स्टोरी

mumbai murder case

शहा यांच्या आईचाही सारख्या पद्धतीनेच खून…

यानंतर पोलिसांनी काजलची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली. यावेळी कमलकांत यांच्या आईचा मृत्यू अशाच प्रकारे झाला असल्याचे पोलिसांच्या लक्षात आलं. १३ ऑगस्ट २०२२ ला कमलकांत यांच्या आईचा मृत्यू झाला. तोदेखील अगदी सारख्या पद्धतीने झाला. म्हणजेच दोघांनाही खाण्यातून विष दिल्याचा संशय पोलिसांना आला. पण एकाच घरात राहत असताना फक्त आई आणि मुलालाच विषबाधा कशी झाली. इतर कुटुंबीयांना याचा त्रास का झाला नाही? अशी शंका पोलिसांसमोर होती.

यामुळे पोलिसांनी काजलची चाचणी करण्यास सांगितले. सुरुवातीला तिने नकार दिला मात्र नंतर ती तयार झाली. याच तपासामध्ये कमलकांत यांचा लहानपणीचा मित्र हितेश याच्याशी काजलचे बोलणं सुरू असल्याचं पोलिसांच्या समोर आलं. यानंतर पोलिसांनी दोघांचीही चौकशी केली असता त्यांच्या प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं. हितेश आणि काजल हिला शहा यांची संपत्ती हडपायची होती. त्यामुळे त्यांचा काटा काढण्याचं दोघांनी ठरवलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेशने इंटरनेटवर कोणते केमिकल शरीरात विषाचे काम करते, याचा संपूर्ण अभ्यास केला होता. त्यानंतर दोघांनी मिळून आधी शहा यांच्या आईची आणि नंतर शहा यांची हत्या केली. या घटनेचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

Crime Diary : पती-मुलाच्या मृतदेहासमोरच बॉयफ्रेंडवर लुटलं शारिरीक प्रेम, वासना इथेच थांबली नाही तर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here