मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकरी प्रश्नावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला. कांदा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. यावेळी उत्तर देण्यासाठी उभे राहिलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यांच्या घोषणाजीमुळे मुख्यमंत्र्यांना काही मिनिटे बोलता आलं नाही. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरवेळी आक्रमक झालेल्या विरोधकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही सेकंदात शांत केले.

कांद्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळतीये. ठिकठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून कांद्याला योग्य दर मिळावा यासाठी बळीराजा निदर्शने करत आहे. कांदा आणि कापसाला रास्त भाव मिळावा म्हणून विधान भवनाच्या पायऱ्यांवर आज विरोधकांनी अनोखे आंदोलन केले. विरोधकांनी शेतकरी प्रश्नावरुन आक्रमक होत कापूस, लसूण आणि कांद्यांच्या माळा गळ्यात घालून विधान भवनात प्रवेश केला. सभागृहातही याचे पडसाद उमटले.

सभागृहात नेमकं काय घडलं?

कांदा आणि कापसाच्या दरावरुन विधानसभेत चर्चा सुरु होती. गेल्या अनेक महिन्यांपासून कापूस-कांद्याचे दप पडलेले असताना राज्य शासनाने शेतकऱ्यांना न्याय द्यावा. नाफेडमार्फत खरेदी सुरु करावी, अशी मागणी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांकडे केली. यादरम्यान विरोधकांनी तुफान घोषणाबाजी करुन सत्ताधाऱ्यांना शेतकरी प्रश्नावरुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर आसूड ओढले. कांदा निर्यात वाढली तर कांद्याचे दर वाढतील. कांदा निर्यातीत सातत्य नसल्याने आंतरराष्ट्रीय व्यापारात तोटा होतोय. नाफेडने कांदा खरेदीला सुरुवात केली तर दर स्थिर राहतील, अशी भूमिका विरोधी पक्षांने मांडली.

कसब्यात रासने येणार की धंगेकर गुलाल उधळणार? ही आकडेवारी वाचा तुम्हाला उत्तर मिळेल…
विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव पुकारलं. मुख्यमंत्री बोलायला उभे राहायला. सभागृहाच्या भावना समजू शकतो. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आम्ही शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करु, असं मुख्यमंत्र्यांनी नेहमीच्या स्टाईलने आश्वासन दिलं. पण सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना थांबवत जोशात येऊन घोषणा द्यायला सुरुवात केली.

तापलेल्या विरोधकांना शांत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस तत्काळ उभे राहिले. कांद्याप्रश्नी विरोधकांना राजकारण करायचंय की शेतकऱ्यांना न्याय द्यायचाय, त्यांनी हे ठरवलं पाहिले. कांद्याची खरेदी नाफेडने सुरु केलीये, असं मुख्यमंत्री जबाबदारीने सांगतायेत. जर विरोधकांकडे यापेक्षा वेगळी माहिती असेल, तर त्यांनी ती सभागृहात मांडावी. आमच्याविरोधात हक्कभंग आणावा, असं चॅलेंजच फडणवीसांनी विरोधकांना दिलं.

दादांचा तो व्हिडीओ ट्विट केला म्हणून काँग्रेस कार्यकर्त्याला अटक केली, कोर्टाने झाप झाप झापलं, २५ हजारांचा दंडही केला
फडणवीसांच्या आव्हानानंतर पुढच्या काही सेकंदातच विरोधक शांत झाले. आक्रमक पवित्रा घेतलेल्या विरोधकांना फडणवीसांनी काही सेकंदात शांत केले. शेतकरी प्रश्नावरून मग चर्चा प्रश्नोत्तराच्या तासाकडे वळली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here