मुंबई: आज फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस असून उद्यापासून नवा महिना सुरु होणार आहे. जर बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असल्यास ते त्वरित पूर्ण करा. कारण मार्चमध्ये तब्बल १२ दिवस बँका बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत तुमच्या महत्त्वाच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो. मार्चमध्ये होळीसह अनेक सण साजरे केले जात आहेत. या सणांमध्ये रविवार आणि दुसरा-चौथा शनिवार अशा एकूण ६ साप्ताहिक सुट्ट्यांचा (Bank Holiday) समावेश होतो.

मार्चमध्ये होळी आणि श्री रामनवमीसह अनेक सुट्ट्यांचा समावेश आहे. अशा स्थितीत तुम्ही तुमचे बँकेशी संबंधित काम लवकरात लवकर पूर्ण करा. मार्चमधील बँक सुट्ट्यांची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात. विशिष्ट राज्याच्या प्रादेशिक सुट्ट्यांवर अवलंबून सर्व सार्वजनिक सुट्ट्यांनादेखील बँका बंद असू शकतात. अशा प्रादेशिक सुट्ट्या संबंधित राज्य सरकार ठरवते आणि RBI च्या अधिकृत वेबसाइटवर त्यांचा उल्लेख नसतो.
१ मार्चपासून होणार हे मोठे बदल, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम; वाचा सविस्तर
मार्च २०२३ मध्ये या तारखांना बँका बंद राहणार

३ मार्च (शुक्रवार) – चपचार कुट – मिझोराममध्ये बँका बंद राहतील
५ मार्च – रविवारी बँका बंद राहतील
७ मार्च (मंगळवार) – होळी / होलिका दहन / धुलंडी / डोल जत्रा – महाराष्ट्र, आसाम, राजस्थान, श्रीनगर, गोवा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, जम्मू, श्रीनगर, तेलंगणा आणि झारखंडमध्ये बँका बंद आहेत.
८ मार्च (बुधवार) – होळी / होळी २रा दिवस – धुलेती / याओसांग दुसरा दिवस: त्रिपुरा, गुजरात, मिझोरम, मध्यप्रदेश, ओडिसा, चंदीगड, उत्तराखंड, सिक्कीम, राजस्थान, जम्मू, उत्तर प्रदेश, बेंगा येथे बँका बंद राहतील
९ मार्च – गुरुवार – (होळी) – बिहारमध्ये बँका बंद राहतील
११ मार्च – महिन्याचा दुसरा शनिवार
१२ मार्च – रविवार
१९ मार्च – रविवार
२२ मार्च – (बुधवार) – गुढी पाडवा / उगादी सण / बिहार दिवस / साजिबू नोंगमापनबा (चेरोबा) / तेलुगु नववर्ष दिन / पहिला नवरात्र – महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, मणिपूर, जम्मू, गोवा, बिहार आणि श्रीनगर या राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
२५ मार्च – चौथा रविवार
२६ मार्च – रविवार
३० मार्च – श्री राम नवमी

गुड न्यूज! ५८ हजार रुपयांचं सोनं फक्त ४० हजारात; फक्त एवढी एकच गोष्ट करा आणि…
नेट बँकिंगने करता येणार काम

बँकांना सुट्ट्या असतील, पण नेट आणि मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही तुमचे काम घरी बसून करू शकाल. बँकांमध्ये या सुविधा २४ तास सुरू असणार आहेत. मात्र, एटीएममध्ये रोख रकमेची कमतरता भासू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही सुट्टीच्या आधी पैसे काढू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here