मुदतपूर्व कर्जाची परतफेड
अदानी समूहाने या वर्षाच्या मार्च अखेरीस ६९० ते ७९० लाख डॉलर्स (सुमारे ६५ अब्ज रुपये) कर्जाची मुदत आधीच परतफेड करण्याची योजना आखली आहे. विशेष म्हणजे हे कर्ज कंपन्यांच्या शेअर्सवर घेण्यात आले आहे. या वृत्तानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. अदानी समूहातील १० पैकी ९ कंपन्यांचे शेअर्स सध्या हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत.
अदानी पॉवर शेअर्सची स्थिती
हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी शेअर्समध्ये जोरदार घसरण झाल्याचे दिसून आले. या काळात अदानी पॉवरचा स्टॉक सुमारे ४०% पडला. स्टॉकच्या ५२ आठवड्यांची सर्वोच्च किंमत ४३२.८० रुपये तर, ५२ आठवड्यांची नीचांकी कामगिरी रु. ११५.५० आहे. दरम्यान, अदानी पॉवरचे मार्केट कॅप रु. ५५,४६२.७८ कोटी आहे.
NCLAT चे प्रकरण काय एनसीएलएटीच्या दोन सदस्यीय खंडपीठाने शापूरजी पालोनजी अँड कंपनीने दाखल केलेल्या याचिकेवर निकाल सुनावला. या याचिकेत अदानी पॉवरने मांडलेल्या कर्ज निवारण प्रस्तावाला मंजुरी देणाऱ्या एनसीएलटीच्या आदेशाला आव्हान देण्यात आले होते. NCLT च्या अहमदाबाद खंडपीठाने, २४ जून २०१९ रोजीच्या आपल्या आदेशात कर्जदार कंपनी कोरबा वेस्ट पॉवरच्या कर्ज निराकरणासाठी अदानी पॉवरने सादर केलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. मात्र, त्यावेळी कोरबा वेस्ट पॉवरकडे शापूरजी पालोनजी अँड कंपनीचे ४५.२२ कोटी रुपये थकीत होते आणि हे प्रकरण लवादाखाली होते.
अदानी पॉवर डिसेंबर तिमाहीचे निकाल
अदानी पॉवरने आपल्या डिसेंबर तिमाहीत तब्बल ९६% तोटा नोंदवला असून कंपनीने अलीकडेच नोंदवले की ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक ९६% घसरून ८.७ कोटी रुपये होता. याशिवाय या आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत अदानी पॉवरने ६९५.५३ रुपयांच्या टॅक्सनंतर एकूण नफ्यात (PAT) ४०१.६% वाढ नोंदवली. तसेच अदानी पॉवरच्या महसूलात डिसेंबर तिमाहीत ४५ टक्क्यांनी वाढून ७,७६४.४ कोटी रुपये झाला आहे.