जळगाव : घरात लग्नाची धामधुम सुरु होती. पुतण्याचा विवाह असल्याने काका तसेच सर्व कुटुंबिय आनंदात होते. मात्र, रात्री देव नाचवण्याच्या कार्यक्रमात अघटीत घडलं. या देव नाचवण्याच्या कार्यक्रमात नाचताना नवरदेवाच्या काकांना हृदयविकाराचा झटका आला आण यातच काकांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवारी रात्री चाळीसगाव तालुक्यातील आडगाव या गावात लगनघरी घडली. पुतण्यावर अक्षता टाकण्यापूर्वी काकांच्या मृत्यूच्या या घटनेने सर्व गाव सुन्न झालंआहे. दिनकर मोहन मिस्तरी (वय ४५, रा. सुरत) असं मयत काकांचे नाव आहे.

दिनकर मिस्तरी यांचा चाळीसगाव तालुक्यातील आडगाव येथील पुतण्या भूषण मिस्तरी याचा २७ फेब्रुवारी रोजी म्हणजे कालच विवाह निश्चित झाला होता. या विवाहासाठी दिनकर मिस्तरी व त्यांचा भाऊ सुरेश हे दोघेही आपल्या परिवारासह आठवडाभरापूर्वीच सुरत येथून आडगावात आले होते. २६ रोजी सायंकाळी पुतण्या भूषणला हळद लागली. रात्री अंगणात मोठा मंडप टाकला. रात्री पाहुण्यांचे जेवण वगैरे झाल्यानंतर देव नाचवण्याचा कार्यक्रम सुरु झाला. या कार्यक्रमात वधु आणि वर अशा दोन्हींकडची मंडळी उपस्थित होती. यावेळी भूषण याचे काका दिनकर हे अगदी साडी नेसून सर्वांना लाजवेल असे नाचत आनंद लुटत होते. मात्र, नाचता नाचता दिनकर मिस्तरी यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. या झटक्यात रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सोहळ्याला उपस्थित नातेवाईकांसह सर्व गाव सुन्न झालं.

शिंदे फडणवीस मोठी माणसं, आमच्यासारख्या किरकोळ माणसाचं भाषण ऐकत नाही, अजितदादांचा पारा चढला

सकाळी मंदिरात पुतण्याचे साध्या पध्दतीने लग्न; दुपारी काकावर अंत्यसंस्कार

कुटुंबातील इतरांना मानसिक धक्का बसू नये म्हणून दिनकर यांच्या मृत्यूची घटना काही काळासाठी पुतण्या तसेच इतरांकडून लपवून ठेवण्यात आली होती. थोडे बरे वाटत नाही म्हणून त्यांना चाळीसगाव येथील रुग्णालयात नेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी आडगावनजीक असलेल्या उंबरखेड या गावानजीक सोमवारी सकाळी ९ वाजता कानुबाई मातेच्या साक्षीने साध्या पध्दतीने भूषणचा विवाह पार पडला. त्यानंतर दुपारी दोन वाजता भूषणचे काका दिनकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिनकर यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

मूळचे चाळीसगाव तालुक्यातील आडगाव येथील रहिवासी असलेले दिनकर मिस्तरी हे चार भाऊ होते. दिनकर आणि त्यांचा भाऊ सुरेश हे दोघेही काही वर्षांपूर्वी व्यवसायानिमित्ताने सुरत येथे परिवारासह स्थायिक झाले होते. तर त्यांचे इतर दोन भाऊ अरुण व संजय हे आडगावातच राहत होते. या दोघांचे निधन झाले आहे. दिनकर यांचे भाऊ संजय यांचेच कुटुंबिय आडगावात वास्तव्यास आहे.

चार वर्षांपूर्वी संजय मिस्तरी यांच्या मुलीचं लग्न निश्चित झालं होतं. घरातील पहिलंच लग्न असल्याने कुटुंबात मोठं आनंदाचं वातावरण होतं. मात्र, यावेळी नियतिला काही औरच मान्य होतं. आपल्या पोटच्या मुलीच्या लग्नाच्या लग्नपत्रिका स्वत: वडिलांनी वाटल्या. अवघ्या पाच दिवसांवर लग्न सोहळा असताना सकाळी आंघोळ करत असताना संजय यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला होता.

तर २७ फेब्रुवारी रोजी संजय यांचा मुलगा भूषण याचा विवाह होता. पुतण्याचे लग्न अगदी धुमधडाक्यात करू म्हणून दिनकर व त्यांचा भाऊ सुरेश या दोघं काकांनी सुनियोजन केले होते. मात्र, यावेळी नियतीने डाव साधला. यावेळी पूतण्यावर अक्षता टाकण्यापूर्वीच काळाने हृदयविकाराच्या झटक्याच्या रुपात दिनकर यांच्यावर झडप टाकली. यात त्यांचा मृत्यू झाला. मुलीच्या लग्नावेळी बापाचे आणि मुलाच्या लग्नावेळी काकाचे निधन झाल्याच्या या विचित्र आणि दुर्दैवी घटनेनं सर्व आडगाव सुन्न झालं असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

ठाकरेंच्या वकिलांनी शिंदे गटाला खिंडीत गाठलं, ‘त्या’ पत्रातील चूक पकडली, सुप्रीम कोर्टात थेट पत्र दाखवलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here