म. टा. प्रतिनिधी, सांगली: राज्यात संकटानं हाहाकार माजवला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लागू करण्यात आला आहे. या काळात काम बंद आणि पगार वेळेत मिळत नसल्यानं आलेल्या नैराश्येतून एसटी महामंडळातील मॅकेनिकने गळफास घेऊन आत्महत्या केली. अमोल धोंडिराम माळी (वय ३५, रा. पेठ, ता. वाळवा) असे मृताचे नाव आहे. हा प्रकार गुरुवारी रात्री उशिरा घडला. तो इस्लामपूर आगारात कार्यरत होता.

इस्लामपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल माळी हे एसटीच्या इस्लामपूर आगारातील मेकॅनिक विभागात कार्यरत होते. करोना संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये एसटीची वाहतूक काही प्रमाणात बंद आहे. या काळात एसटीच्या कर्मचाऱ्यांना पुरेसा पगार मिळाला नाही. काम बंद असल्याने, तसेच नियमित पगार मिळत नसल्याने अमोल अस्वस्थ होते.

कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. आर्थिक संकट कोसळलं होतं. त्यातून सावरण्यासाठी ते गेल्या दोन महिन्यांपासून मजुरीचीही कामे करत होते. लांबत चाललेला लॉकडाउन आणि एसटीच्या रुतलेल्या चाकांमुळे आर्थिक गाडा हाकणार कसे या विवंचनेत ते होते. त्यांची अस्वस्थता वाढली होती. आर्थिक विवंचना आणि नैराश्यातून त्यांनी अखेर गुरुवारी रात्री उशिरा राहत्या घरी छताच्या हुकाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, पाच वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षांची मुलगी असं कुटुंब आहे.


Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here