जय किशोर यांच्या स्मारकाच्या जमिनीवरून वाद सुरू होता. गेल्या वर्षी २४ फेब्रुवारीला स्मारकाचं अनावरण करण्यात आलं. त्या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. मात्र आता त्याच शहिदाच्या वडिलांना पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक दिली गेल्यानं ग्रामस्थ संतापले आहेत. मध्यरात्री घडलेल्या प्रकारामुळे गावात तणावाचं वातावरण आहे.
नेमका वाद काय?
या संपूर्ण वादामागे जय किशोर यांच्या स्मारकासाठी वापरलेली जमीन आहे. सरकारी जमिनीवर स्मारक उभारण्यात आलं. जबरदस्तीनं स्मारक उभारून राज कपूर यांनी आमचा रस्ता ताब्यात घेतल्याचा आरोप गावातील दलितांनी केला. राज कपूर सिंह यांनी शिवीगाळ केल्याचा दावा करत त्यांनी पोलीस तक्रार नोंदवली.
पोलिसांनी आम्हाला १५ दिवसांत स्मारक हटवायला सांगितलं होतं. मात्र पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास येऊन माझ्या वडिलांना अटक केली. यादरम्यान पोलिसांनी वडिलांना दिलेली वर्तणूक अतिशय वाईट होती. माझे वडील जणू काही दहशतवादी आहेत, अशा प्रकार पोलीस त्यांना वागवत होते, असं राज कपूर सिंह यांच्या दुसऱ्या मुलानं सांगितलं. पोलिसांनी माझ्या वडिलांना फरफटवलं. त्यांच्या कानशिलात दिल्या आणि शिवीगाळ केली. पोलीस ठाण्यात त्यांना मारहाण करण्यात आली, असे आरोप राज कपूर यांच्या मुलानं केले.