केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार या शहरांना नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत ठेवण्यात आले आहे. जेणेकरुन या शहरातील हवेची गुणवत्ता सुधारता येईल. २४ राज्यातील १३१ शहरातील Particulate Matter मध्ये २० ते ३० टक्के घट करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हे लक्ष्य २०२४ ते २०२८ या काळासाठी ठेवण्यात आले आहे.
सर्वाधिक प्रदूषण असलेली शहरे महाराष्ट्रात आहेत. राज्यातील १९ शहरे प्रदूषितअसून गेल्या पाच वर्षात येथील हवेचे प्रदूषण राष्ट्रीय सरासरी पेक्षा अधिक आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो, येथील १७ शहर प्रदूषित आहेत. त्यानंतर आंध्र प्रदेश १३, पंजाब ९ आणि ओडिशा, मध्य प्रदेश आणि हिमाचलमधील प्रत्येकी ७ शहरांचा समावेश होतो.
महाराष्ट्रातील ही १९ शहरे प्रदूषित
अकोला
अमरावती
औरंगाबाद
बदलापूर
चंद्रपूर
जळगाव
जालना
कोल्हापूर
लातूर
मुंबई
नागपूर
नाशिक
नवी मुंबई
पुणे
सांगली
सोलापूर
ठाणे
वसई-विरार
उल्हासनगर
पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी १३ फेब्रुवारी २०२३ रोजी लोकसभेत एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरात या शहरांची यादी दिली आणि यासंदर्भात काय उपाय योजना केल्या जात आहेत याची माहिती दिली. गेल्या ५ वर्षातील आकडेवारीच्या आधारावर ही यादी करण्यात आली असून या शहरांची लोकसंख्या ८० लाखांपेक्षा अधिक आहे.