सायंकाळी ५ वाजता राजदत्ताने मित्रास अभ्यास करण्यासाठी घरी बोलावले होते. राजदत्ताचा मित्र ५ च्या सुमारास राजदत्ताच्या घरी पोहोचला. त्यावेळी राजदत्ता घराचा दरवाजा उघडत नसल्याने मित्रांनी दरवाजा तोडला. त्यावेळी राजदत्ता घराच्या छताला साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. यावेळी मित्रांनी एकच आक्रोश केला. राजदत्ताला पाचोरा शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी पाचोरा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विकास खरे करत आहेत.
पवार कुटुंबाचा वंशाचा दिवा विझला
राजदत्ता लहान असताना त्याच्या आईचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यामुळे दरम्यानच्या काळात राजदत्ताचे वडील नरेंद्र पवार यांनी दुसरे लग्न केले. सर्व काही सुरळीत सुरु असताना नियतीने डाव साधला. नरेंद्र पवार यांना यकृताचा आजार झाला. त्यामुळे त्यांचे निधन झाले. राजदत्ता हा पवार कुटुंबियांचा एकुलता एक मुलगा होता. त्याला दोन बहिणी असून त्यातील एका बहिणीचे लग्न झाले आहे, तर दुसरी बहिण नाशिक येथे शिक्षण घेत आहे.
आई वडील नसल्याने संपूर्ण जबाबदारी राजदत्ताच्या खांद्यावर आली होती. उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदावर नोकरी मिळावी ही जिद्द उराशी बाळगून राजदत्ता शिक्षण घेत होता. नाशिक येथे खाजगी क्लासेस लावून तो बारावीची परीक्षा देत होता. राजदत्ताच्या मृत्यूने पवार कुटुंबियांचा वंशाचा दिवा विझला असून घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.