वाचा:
सचिन सावंत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले असून गांधीभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्याबाबत माहिती दिली. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांची नियुक्ती सदर पदावर जुलै २०१९ मध्ये झाली होती. त्या अगोदर ते प्रतिनियुक्तीवर केंद्र सरकारच्या सेवेत मुंबईतील अंधेरी येथील सिप्झ येथे विशेष आर्थिक क्षेत्राचे विकास आयुक्त म्हणून कार्यरत होते. या कार्यकाळात त्यांच्याविरोधात गैरव्यवहाराच्या तक्रारी आल्यानंतर ११ मे २०१८ रोजी केंद्रीय दक्षता आयोगाने वाणिज्य मंत्रालयाला त्यांच्या विरोधात चौकशी करण्याचे आदेश दिले होते. याच गैरव्यवहाराबाबत महालेखापालांनी जून २०१८ रोजी केलेल्या लेखापरीक्षणात ताशेरे ओढले आहेत. सदर लेखापरीक्षणाचा अहवाल संसदेच्या पटलावर मांडला गेलेला आहे. तसेच केंद्रीय दक्षता आयोगाने दिलेले चौकशीचे आदेश आणि महालेखा परीक्षकांनी ओढलेले ताशेरे याकडे दुर्लक्ष करून राज्याचा मुख्य निवडणूक अधिकारी या अत्यंत संवेदनशील पदावर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या केवळ काही महिने आधी त्यांची नियुक्ती केली गेली. यातून अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण होतात, असे नमूद करतानाच लोकशाहीकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष असण्याकरिता निवडणूक आयोग दबावाखाली काम करत नाही हे जनतेसमोर स्पष्ट होणे आवश्यक आहे, असे सावंत म्हणाले.
वाचा:
काँग्रेसने उपस्थित केलेले प्रश्न
१. निवडणूक आयोगाने केंद्रीय दक्षता आयोगाकडून सदर नियुक्तीबाबत त्यांचे मत का विचारले नाही? जर विचारले असेल तर त्याकडे दुर्लक्ष का केले?
२. तत्कालीन महाराष्ट्र सरकारने सदर प्रकरणाची माहिती निवडणूक आयोगाला दिली होती का? व फडणवीस सरकारला याची माहिती होती का?
३. सदर गैरव्यवहाराच्या चौकशी आदेशामध्ये केंद्रीय दक्षता आयोगाने चौकशी पूर्ण करण्याची मर्यादा १२ आठवडे दिली असतानाही दोन वर्षे झाली तरी ही चौकशी पूर्ण का झाली नाही? अजूनही चौकशी चालू आहे, असे उत्तर केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने नागरी तक्रार अर्जाला उत्तर देताना स्पष्ट केले आहे. या प्रकरणामध्ये सध्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे तत्कालीन कनिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप निश्चिती करून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. परंतु अद्यापही मुख्य निवडणूक अधिकारी या पदावर असणाऱ्या बलदेव सिंह यांच्यावर आरोपपत्र का दाखल करण्यात आले नाही?
४. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाही तत्कालीन फडणवीस सरकार नवीन मुख्य निवडणूक अधिकारी नियुक्त करण्याकरिता प्रयत्नशील होते व फडणवीस सरकारने त्यावेळी केलेली मागणी निवडणूक आयोगाने नाकारली होती. फडणवीस सरकारचा यामागचा हेतु काय होता? अगोदरच्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी ते का प्रयत्नशील होते?
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
I used to be able to find good info from your blog posts.
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
I really like and appreciate your blog post.
I really like and appreciate your blog post.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.