मुंबई : भारतीय शेअर बाजार आज काही स्थिरावल्याचे दिसत आहे. आज बुधवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात चांगल्या वाढीसह हिरव्या चिन्हाने झाल्याचे दिसत आहे. जागतिक बाजारातील तेजीचा परिणाम आज देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या भावनेवरही दिसून आला. बाजार उघडताच गुंतवणूकदारांनी खरेदी सुरु केली आणि सेन्सेक्स-निफ्टीने जबरदस्त आघाडी घेतली. सेन्सेक्स आणि निफ्टी समभागांमध्ये जोरदार व्यवहार होत आहेत. आज बँक समभागात वाढ झाल्यामुळे भारतीय बाजारालाही काही प्रमाणात आधार मिळताना दिसत आहे.

आजच्या सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) ३० शेअर्सचा सेन्सेक्स १७४.३६ अंक किंवा ०.३० टक्क्यांनी वाढून ५९,१३६.४८ वर खुला झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) ५० शेअर्सचा निफ्टी ५६.१५ अंक किंवा ०.४३ टक्क्यांच्या वाढीसह १७,३६०.१० च्या पातळीवर उघडला.

अदानी शेअरची ‘पॉवर’, सततच्या घसरणीनंतर स्टॉक बनला ‘रॉकेट शेअर’, स्वस्तात खरेदी सुरू?
सेन्सेक्स-निफ्टीचे शेअर्स
आज मार्केटच्या सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्समधील ३० पैकी २९ समभाग हिरव्या चिन्हावर व्यवहार करत असताना फक्त एक पॉवरग्रिडच्या शेअरमध्ये घसरणीने कामकाज होताना दिसत आहे. याशिवाय निफ्टीच्या ५० समभागांपैकी ३९ शेअर्स वाढून तर ११ समभाग घसरणीसह व्यवहार करत आहेत. याशिवाय आज अदानी ग्रुपच्या शेअर्सची देखील पॉझिटिव्ह सुरुवात होताना दिसतेय. सुरुवातीच्या सत्रात अदानी पॉवर, अदानी विल्मर, अदानी एंटरप्रायझेस, अदानी ग्रीन, अदानी पोर्ट, अदानी गॅस, एसीसी आणि अंबुजा सिमेंट वाढीसह उघडले. तर एनडीटीव्हीची अवस्था अजूनही बिकट बनली आहे.

हिंडेनबर्गचे चटके! फक्त अदानीच नाही LIC-SBI पण आणखी खड्ड्यात, गुंतवणूकदारांच्या पोटात गोळा
कोणते शेअर्स वाढले
आज सेन्सेक्सच्या टाटा स्टील, एम अँड एम, अॅक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, टीसीएस, एसबीआय, एल अँड टी, टाटा मोटर्स, मारुती, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, विप्रो, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडसइंडस बँक, आयसीआयसीआय बँक, टायटन, आयटीसी, एशियन पेंट्स, कोटक बँक, एचयूएल, एचडीएफसी, इन्फोसिस आणि भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये तेजीने व्यवहार होतोय.

कोणते शेअर्स घसरले
सेन्सेक्समधील एनटीपीसी आणि पॉवरग्रिड या शेअर्समाडे घसरण होताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here