boy found dead, दहावीत शिकणारा सचिन एकाएकी बेपत्ता; चार दिवसांनी बॉडी सापडली, दोन्ही हात मोडलेले; घात झाला? – boy missing from 4 days found dead in farm police probe underway two detained
छ्त्रपती संभाजीनगर: अचानक घरातून बेपत्ता झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह गावातील एका शेतात हात तोडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून अपहरण करून हत्या करण्यात आली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत असून पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. ही घटना वैजापूर तालुक्यातील बोरसर गावात घडली. सचिन प्रभाकर काळे असे मृत मुलाचे नाव आहे.
सचिन काळे दहावीच्या वर्गात शिकत होता. त्याची गावातीलच एका मुलीसोबत मैत्री होती. तो नेहमी तिच्याशी बोलायचा. काही दिवसांपूर्वी सचिनने त्या मुलीला मोबाईल फोन गिफ्ट म्हणून दिला होता. याबद्दल तिच्या घरच्यांना समजले. दरम्यान सचिन २४ फेब्रुवारीपासून बेपत्ता झाला होता. याबाबत पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. सचिनचा सर्वत्र शोध सुरू असताना गावातीलच एका शेतात त्याचा मृतदेह आढळून आला. त्याचे दोन्ही हात मोडलेल्या अवस्थेत होते. यामुळे त्याला बेदम मारहाण झाली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. हसरा चेहरा रडवून गेला! घर सोडून गेली, तक्रार करताच परत आली; बालपणीच्या फोटोंमुळे जीव दिला पोलिसांनी सचिनचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलवला आहे. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून प्रेमप्रकरणातून ही हत्या करण्यात आली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र या शक्यतेला पोलिसांकडून अद्याप अधिकृतपणे दुजोरा मिळालेला नाही. या प्रकरणात आणखी काही आरोपींना ताब्यात घेण्याची शक्यता आहे.