वाचा:
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘ ’ नियमावलीला विरोध करीत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उद्यापासून (एक ऑगस्ट) जनजीवन पूर्ववत सुरू करण्याचे आवाहन केले. ते सुभेदारी विश्रामगृह येथे आज पत्रकार परिषदेत बोलत होते. कोविडचे भय राहिले नसल्यामुळे सामान्य जीवन जगायला हरकत नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी विश्वासाने सांगितले.
वाचा:
अर्थव्यवस्थेला खिळ बसली असून तिला रुळावर आणण्याची जबाबदारी सरकारची आहे. किमान आता लोकांनी स्वत:ला वाचवण्यासाठी जनजीवन सुरू करावे, असे आंबेडकर म्हणाले. बकरी ईद, रक्षाबंधन, अण्णा भाऊ साठे जयंती साजरी करावी. किमान रक्षाबंधनाच्या दिवशी सरकारने सार्वजनिक वाहतूक सुरू करावी, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. १ ऑगस्टला नागरिकांनी स्वत:ला आवडणाऱ्या पक्षाचा झेंडा गॅलरीत फडकवावा. हा केंद्र व राज्य सरकारला जनतेचा इशारा असेल असे त्यांनी नमूद केले. राम मंदिर भूमिपूजनाबाबत दोन दिवसात भूमिका मांडणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेला वंचितचे सरचिटणीस अमित भुईगळ, जिल्हाध्यक्ष प्रभाकर बगले, मेघानंद जाधव, अॅड. लता बामणे, महेश निनाळे आदी उपस्थित होते.
वाचा:
फडणवीसांना नवरी मिळेना
राज्यातील महाविकास आघाडी सरकार टिकणार का, असे विचारले असता आंबेडकर यांनी खोचक टीका केली. भाजपला लग्न करायची घाई झाली आहे. पण, फडणवीस यांना नवरी सापडेना. ज्या दिवशी नवरी सापडेल त्या दिवशी सरकार पडेल. त्यामुळे नवरी मिळेपर्यंत सरकार टिकेल, असे आंबेडकर म्हणाले. नरेंद्र मोदी हे राजकीय नेते नसून धार्मिक नेते आहेत. त्यांच्यात निर्णयक्षमता नसल्याने करोना परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात अपयश आल्याची टीकाही आंबेडकर यांनी केली. केंद्र सरकार ८० कोटी लोकांना धान्याचे वाटप केल्याचे सांगत आहे. ही घोषणा २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजसारखी आहे. जे कुणालाच मिळाले नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Very good article! We are linking to this particularly great content on our site. Keep up the great writing.
I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
These are actually great ideas in concerning blogging.
Like!! Thank you for publishing this awesome article.