दुसरीकडे, अदानी शेअर्सबद्दल बोलायचे तर बऱ्याच काळानंतर अदानी शेअर्सने झेप घेतली. अदानी समूहाच्या १० पैकी ८ शेअर्स तेजीसह हिरव्या रंगात क्लोज झाले. यामध्ये अदानींची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी ग्रीन यांनी सर्वोत्तम कामगिरी केली. फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवसाच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांच्या नफा-तोट्याबद्दल बोलायचे तर बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप २५८ कोटी रुपयांवरून २५७.८० लाख कोटी रुपयांवर घसरले. म्हणजे गुंतवणूकदारांचे या दिवशी एकूण २० हजार कोटींचे नुकसान झाले. मात्र, अदानीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना दिलासा मिळाला.
‘अदानी’ शेअर्सनी दाखवली ताकद
मंगळवारी अदानी समूहाची प्रमुख कंपनी, अदानी एंटरप्रायझेसचा शेअर १४.९० टक्क्यांनी वाढून क्लोज झाला. दुसरीकडे, अदानी पोर्ट्सचा शेअर ५.११ टक्के, तर अदानी पॉवरचा शेअर ४.९८ टक्क्यांनी वधारला. मात्र, अदानी टोटलने घसरणीसह कामकाज थांबवले. अदानी टोटलचे शेअर्सही आज ४.९९ टक्क्यांनी घसरला असताना अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्येही ५% घसरण सुरूच आहे. त्याचवेळी, अदानी विल्मारच्या शेअर्समध्ये पाच टक्क्यांनी वाढ झाली असून अंबुजा सिमेंटचा समभाग ३.७६ टक्क्यांनी वधारला.
गौतम अदानींची भरारी
शेअर्समधील घसरणीचा परिणाम गौतम अदानी यांच्या संपत्तीवरही दिसून आला. फोर्ब्स अब्जाधीश निर्देशांकानुसार, २८ फेब्रुवारी रोजी गौतम अदानींची एकूण संपत्ती कालही घसरली पण त्याची गती काहीशी मंदावली. गेल्या काही दिवसांपासून गौतम अदानी यांना दररोज २ ते ३ अब्ज डॉलर्सचे नुकसान होत होते. पण मंगळारचा वेग काहीसा कमी झाला. गौतम अदानी यांना काल १६० दशलक्ष डॉलर्सचा झटका बसला असून त्यांचे आतापर्यंत अब्जावधींचे नुकसान झाले आहे.
फोर्ब्सच्या अब्जाधीश निर्देशांकात त्यांची एकूण संपत्ती $३४ अब्ज वरून $३५.१ अब्जावर राहिली आहे. यापूर्वी जागतिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी ३६व्या क्रमांकावर घसरले होते, पण आता त्यांच्या क्रमवारीत सुधारणा होताना दिसतेय. मंगळवारी जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी यांनी दोन स्थानांनी झेप घेत ३४व्या क्रमांकावर पोहोचले.