हिंगोली : रागावणाऱ्या वडिलांच्या मानेवर कुऱ्हाडीचे वार करून अल्पवयीन मुलानेच त्यांचा खून केला. हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील सेलू येथे ही घटना घडली आहे. हा प्रकार लपवण्यासाठी अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना मंगळवारी (२८ फेब्रुवारी) पहाटेच पोलिस घरी धडकले अन् सर्व प्रकार उघड झाला. पोलिसांनी मुलास ताब्यात घेतले.

पोलिसांच्या माहितीनुसार, सेलू येथील भाऊराव पांडुरग कबले (वय ४२ वर्ष) हे कुटुंबीयांसह राहतात. घरी पत्नी, तीन मुले असा परिवार असून उदरनिर्वाहासाठी शेती नसल्याने कबले दाम्पत्य रोजमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते.

दरम्यान, सोमवारी (२७ फेब्रुवारी) सायंकाळपासून भाऊराव व त्यांचा अल्पवयीन मुलगा यांच्यात किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला होता. यामध्ये त्यांच्या आईने मध्यस्थी केली होती. त्यानंतर रात्री भाऊराव यांनी मुलास रागावण्यास सुरुवात केली. संतापलेल्या मुलाने हातात कुऱ्हाड घेऊन बाजेवर असलेल्या वडिलांच्या मानेवर कुऱ्हाडीचा वार केला. यामध्ये भाऊराव यांचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे घरातील कुटुंबीय घाबरून गेले होते. परंतु ही घटना घराबाहेर कळाल्यास त्याचे परिणाम वाईट होतील. या भीतीपोटी त्यांनी कुठेही वाच्यता न करता रात्रभर जागून काढली. २८ फेब्रुवारीला सकाळच्या सुमारास कबले कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. परंतु या घटनेची माहिती कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांना कळाल्याने जमादार तुकाराम आमले,बालाजी जोगदंड, यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन मृतदेहाची पाहणी केली. यावेळी गजानन कबले यांच्या मानेवर कुऱ्हाडीचा वार असल्याचे दिसून येतात घरातील कबले कुटुंबीयांना चांगलाच घाम फुटला.

गावी सोय नसल्याने मामाकडे राहून शिक्षण, स्वप्नांच्या वाटेवर जातानाच विद्यार्थिनीचा करुण अंत
यावेळी पोलिसांनी उपस्थित असलेल्यांपैकी सर्वांची चौकशी केल्यानंतर अल्पवयीन मुलाने वडिलांच्या मानेवर कुऱ्हाडीचा वार केल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.

पैशाच्या पावसाचं आमिष, सज्जन महाराजाने पुरतं लुटलं, कर्जतच्या हॉटेलवर बोलावून तरुणाला…
या प्रकरणात पुंजाजी कबले यांनी दुपारच्या सुमारास पुरंदर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ज्यामध्ये भांडण झाल्याच्या रागाच्या भरात अल्पवयीन मुलाने वडील भाऊराव कबले यांच्या गळ्यावर व जबड्यावर कुऱ्हाडीचा घाव घालून त्यांना जीवे मारून खून केला. तसेच खुनाची माहिती पोलिसांना व इतरांना दिल्यास जीवे मारून टाकण्याची धमकी दिल्याने अल्पवयीन मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे हे करीत आहेत.

जनतेसोबत गद्दारी केली, एका डाकूसोबत गेलाय; शेतकऱ्यांनं बच्चू कडूंना सुनावलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here