नवी वर्षी बाजार किती दिवस बंद?
वर्ष २०२३ मध्ये शेअर बाजार १५ दिवस बंद राहणार असून या काळात इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज, एसएलबी आणि कमोडिटी डेरिव्हेटिव्ह आणि इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट विभाग बंद राहतील.
होळी/धुलिवंदन सणाची बाजाराला सुटी
हिंदू कॅलेंडरनुसार होळी हा दोन दिवसांचा सण असतो. ७ मार्च रोजी राज्यात होळीचा उत्सव गावागावात साजरा केला जातो. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ८ मार्चला धुलिवंदनाचा आनंद लुटला जातो. बीएसईच्या सुट्टीच्या यादीनुसार होळीच्या निमित्ताने ७ मार्च रोजी शेअर बाजार बंद राहतील. परंतु एक्सचेंजच्या वेबसाइटनुसार सुट्टीची तारीख दोन्ही दिवसांपैकी कोणत्याही दिवशी बदलायची असल्यास त्यानंतर त्यासाठी स्वतंत्र परिपत्रक जारी करून माहिती देण्यात येईल.
Home Maharashtra Stock Market Holiday: गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी…. मार्चमध्ये दोन दिवस मार्केट बंद –...