वाशिम: विदर्भात सध्या हरभरा-गहू काढणीचा हंगाम सुरू आहे. मात्र काढणीस आलेले पीक जंगली जनावर फस्त करतात. काढून वाळत घातलेल्या व काढणीस आलेल्या पिकाची राखण करण्यासाठी शेतकरी रात्रभर जागल करण्यासाठी शेतात जातात. अनेकदा या शेतकऱ्यांवर रानडुकरे, रोही, अस्वल हल्ले करतात. असाच प्रकार वाशिमच्या मंगरुळपिर तालुक्यातील तऱ्हाळा शेतशिवारात घडला आहे.

तऱ्हाळा येथील अठ्ठावीस वर्षीय तरुण शेतकरी गणेश प्रकाश बाईस्कर शेतात जमा करून ठेवलेल्या हरभऱ्याची राखण करण्यासाठी काल रात्री शिवारात गेला होता. पहाटे पाचच्या सुमारास त्याच्यावर रान डुकरांच्या कळपाने हल्ला केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी काही शेतकरी शेतात गेले असता त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. हा हल्ला इतका भीषण होता की गणेशच्या शरीरावर मोठमोठ्या जखमा झाल्या.
हसरा चेहरा रडवून गेला! घर सोडून गेली, तक्रार करताच परत आली; बालपणीच्या फोटोंमुळे जीव दिला
आठ दिवसांवर आले होते लग्न
रान डुकरांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या गणेशचा विवाह आठ दिवसांवर आला होता. मात्र लग्नाच्या गडबडीत शेतातील कामे रेंगाळतील व येत्या काही दिवसात पावसाची शक्यता असल्याने काल गडबडीने त्याने हरभऱ्याची सोंगणी करण्याचा निर्णय घेतला. काल सोंगणीनंतर राखण करण्यासाठी ते शेतात गेले होते. प्रकाश विठ्ठलराव बाईस्कर यांना पाच मुले आणि एक मुलगी आहे. गणेश भावंडांमध्ये चौथा होता. घरात त्याच्या लग्नाची तयारी सुरू होती. आई वडील मुलाच्या सुखी संसाराची स्वप्ने पाहत होती. मात्र आता बाईस्कर कटुंबाच्या डोळ्यात अश्रूच उरले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here