सशस्त्र दलांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्याबाबत अनेक तक्रारी
सध्याच्या काही दिवसांमध्ये चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये भारतीय सैन्यदलांचे अधिकारी आणि जवानांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. वेब सीरिजमध्ये तर सैन्य दलांच्या अधिकाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचे आणि याबरोबरच लष्करी गणवेशाचा देखील मान राखला जात नसल्याच्या तक्रारी संरक्षण मंत्रालयाकडे आल्याचे सूत्रांनी माहिती देताना सांगितले.
काही प्रकरणांमध्ये माजी सैनिकांनीह दाखल केले FIR
संरक्षण मंत्रालयाकडे ज्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत, त्यांमध्ये कोड-एम, एक्स एक्स अनसेंसर्ड (सीजन-२) यांचा देखील समावेश आहे. या सीरिजमध्ये ज्या पद्धतीने लष्कराबाबत चित्रण करण्यात आले आहे, ते सत्यापासून कोसो दूर आहे आणि मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे, असे या तक्रारींमध्ये म्हटले गेले आहे. काही माजी सैनिकांनी तर या प्रकरणी एफआयआर देखील दाखल केले आहेत. या प्रकरणी त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्म आणि निर्मात्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची देखील मागणी केली आहे.
वाचा:
… तर मग संरक्षण मंत्रालयाची घ्यावी लागेल परवानगी
भारतीय लष्कराच्या थीमशी संबंधित सर्व चित्रपट, डॉक्युमेंटरी किंवा वेब सीरीज दाखवण्यापूर्वी संरक्षण मंत्रालयाचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे अशा सूचना प्रोडक्शन हाउसना द्यावेत, असे संरक्षण मंत्रालयाने औपचारिकपणे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला, तसेच सेंसर बोर्डाला लिहिले आहे. आपल्या ज्या चित्रिकरणामुळे सैन्यदलाची चुकीची प्रतिमा रंगवली जाते आणि सैनिकांच्या भावना दुखावल्या जातील अशा प्रकारचे कोणतेही चित्रण करू नये, असा सूचना देण्यासही संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे.
वाचा:
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Your site is very helpful. Many thanks for sharing!
I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.
These are actually great ideas in concerning blogging.
Thanks so much for the blog post.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.