या प्रकरणी अधिक माहिती अशी की, अकरावीत शिकाणारा विद्यार्थी हा छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रसिद्ध महाविद्यालयात कॉमर्स शाखेत इयत्ता अकरावीचे शिक्षण घेत होता. त्याचे वडील कामगार पुरवठा करण्याचे खाजगी कंत्राट घेतात. त्याला दोन मोठ्या बहिणी असून तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.
गेल्या काही दिवसांपासून तरुणाचे अभ्यासाकडे लक्ष नव्हते. त्यामुळे सोमवारी वडील त्यावर रागावले. व त्याला अभ्यास करण्यासाठी सांगितले. त्यामुळे तो रागावला व त्याच्या खोलीत जाऊन त्याने आत मधून दार बंद करुन घेतले. मात्र बराच वेळ झाल्या नंतरही मुलगा बाहेर न आल्याने घरच्यांनी त्याला आवाज दिलं, तेव्हा आतून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता.
अल्पवयीन मुलाने दोरीच्या सहाय्याने खोलीतील सीलिंग फॅनला गळफास घेतल्याचे आई-वडिलांना समजले. घरच्यांनी शेजाऱ्याची मदत घेत त्याला फासावरुन खाली उतरून रुग्णालयात हलविले, मात्र तो पर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी जवाहर नगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलिसांना खोलीतून एक सुसाईड नोट आढळून आली आहे. त्यात सॉरी आई बाबा मला माफ करा, आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही, असा मजकूर लिहिलेला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
संभाजीनगर नामांतराला केंद्राकडून परवानगी; एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची पहिली प्रतिक्रिया