नवी दिल्ली : नवीन महिन्याच्या पहिल्या दिवशी सोने खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १ मार्च २०२३ रोजी मौल्यवान सोन्याचा दरात घट झाली असून चांदीची किंमती वाढली आहे. बुधवारी सोन्याच्या फ्युचर किमतीत घसरण झाली, मात्र चांदीच्या दरात वाढ झाली. एप्रिल २०२३ मध्ये डिलिव्हरीसाठी असलेल्या सोन्याचा भाव २३ रुपये किंवा ०.०४ टक्क्यांनी घसरून ५५ हजार ७३३ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. तर मागील सत्रात एप्रिल डिलिव्हरीसाठी असलेल्या सोन्याचा भाव ५५,७५६ रुपये प्रति १० ग्रॅम होता.

फेब्रुवारी महिन्यात सोन्या आणि चांदीच्या घसरणी दरम्यान जर आज तुम्ही सोने किंवा चांदीची खरेदी केली असेल तर आता त्याचे दर वाढल्यामुळे तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल. लग्नसराईच्या हंगामात अनेक ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले, जे आता फायदेशीर आहे. गेल्या काही काळात विक्रमी पातळी पोहोचल्यानंतर सोने आणि चांदीच्या भावात सातत्याने घसरण होत आहे.

SIP चा छप्परफाड परतावा; दरमहा १५ हजार रुपयांची बचत आणि बना करोडपती! पाहा कसं?
चांदीच्या किमतीत वाढ
चांदीबद्दल बोलायचे तर त्याचा प्रति किलो भाव ६४ हजार रुपया पार पोहोचाल आहे. मे २०२३ मध्ये डिलिव्हरीसाठी असलेल्या चांदीचा भाव २५६ रुपये म्हणजे ०.४० टक्क्यांनी वाढून ६४,८७९ रुपये प्रति किलो इतका वाढला. तर मागील सत्रात मे कराराच्या चांदीचा भाव ६४ हजार ६२३ रुपये प्रति किलो होता. गेल्या काही दिवसांपूर्वी चांदीने देखील ७१,००० प्रति किलोची विक्रमी पातळी गाठली होती तर आज बुधवारी चांदीचा भाव ६३ हजाराच्या पातळीवर घसरला आला. अशाप्रकारे चांदीचा दरात प्रतिकिलो ८००० रुपयांपर्यंत घसरण झाली आहे.

Home Loan: लवकरात लवकर कर्जमुक्त व्हायचंय, मग कर्जाचा कालावधी वाढवावा की EMI, काय फायदेशीर
सराफा बाजारातही तेजी
बुधवारी सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. इंडिया बुलियन्स असोसिएशनने जाहीर केलेल्या किमतीनुसार २४ कॅरेट सोन्याने ५६,०८५ रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर झेप घेतली असून चांदीच्या किमतीही जबरदस्त वाढ झाली आणि ते ६४ हजारांच्या पुढे ट्रेड करत आहेत.

सोन्याचा उच्चांक
लक्षात घ्या की २ फेब्रुवारी २०२३ रोजी सोन्याच्या दरांनी सर्वकालीन उच्च पातळी होती. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) वेबसाइटनुसार, या दिवशी सोने ५८ हजार ८८२ रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर पोहोचले, मात्र, त्यानंतर सोन्याच्या दरात सातत्याने घसरण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here