नवी दिल्ली : आजच्या काळात बँकेचे व्यवहार एक सामान्य गोष्ट बनली आहे. पैसे देण्यासाठी बहुतेक लोक चेकबुकचा वापर करतात. ही एक सर्वात जुनी पेमेंट पद्धतींपैकी एक असून याला खूप सुरक्षित देखील मानले जाते. पण याच दरम्यान चेक बाऊन्स झाल्याचे देखील अनेकदा ऐकायला मिळते. चेक बाऊन्सची वाढती प्रकरणे पाहता सरकार लवकरच अशा प्रकरणांना लगाम घालण्याच्या प्रयत्नात आहेत आणि संबंधित नियमांमध्ये बदल करू शकेल, असे अपेक्षित आहे.

देशात चेक बाऊन्सची अनेक प्रकरणे समोर आली आहेत, मात्र आतापर्यंत या प्रकरणांचा कोणताही निकाल लागलेला नाही. आणि आता या बाबींसाठी सरकार नवीन योजना तयार करत असून जर एखाद्याचा चेक बाऊन्स झाला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई तर होईलच, पण त्या व्यक्तीच्या इतर खात्यातून पैशाची वसुली केली जाईल. चेक बाऊन्सच्या संबंधित नवीन नियम आणण्यासाठी सरकार वेगाने काम करत असताना यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयाची एक तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे, जी संबंधित नियम सुचवते. याशिवाय नवीन नियमांबाबत अर्थ मंत्रालयाने काही काळापूर्वी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती.

Gold Price Today: खुशखबर… सोने खरेदी पुन्हा स्वस्त, मात्र चांदी महागली; आजचा भाव चेक करा
लक्षात घ्या की चेक जारी करण्यापूर्वी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. नाहीतर तुम्हाला अनेक मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

SIP चा छप्परफाड परतावा; दरमहा १५ हजार रुपयांची बचत आणि बना करोडपती! पाहा कसं?
चेक बाऊन्सच्या प्रकरणात किती वर्षाची शिक्षा
सध्याच्या नियमानुसार चेक बाऊन्सच्या प्रकरणांमध्ये किमान दोन वर्षांच्या शिक्षेची तरतूद असून येत्या काळात त्यात बदल केला जाऊ शकतो. वृत्त संस्था पीटीआयच्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या पॅनेलने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट, १८८१ मध्ये काही बदल सुचवले होते. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट, १८८१ (NI Act) अंतर्गत चेक बाऊन्स झाल्यास शिक्षेची तरतूद आहे.

Home Loan: लवकरात लवकर कर्जमुक्त व्हायचंय, मग कर्जाचा कालावधी वाढवावा की EMI, काय फायदेशीर
नवीन नियम कोणते असणार
चेक बाऊन्सचे नवीन नियम लागू झाल्यानंतर जर तुमचा चेक बाऊन्स झाला, तर त्यानंतर तुम्ही इतर कोणत्याही बँकेत खाते उघडू शकणार नाही. चेक बाऊन्सचा नवीन नियम लागू झाल्यास बाऊन्स रेट कमी होईल, असे सरकारला आशा आहे. याशिवाय चेक बाऊन्स झाल्यास तुम्हाला कर्ज घेतानाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. म्हणजे चेक बाऊन्स एक कर्ज डिफॉल्ट म्हणून दाखवले जाऊ शकते. असे झाल्यास डिफॉल्टरच्या CIBIL स्कोरवर परिणाम होऊ शकतो आणि भविष्यात कर्ज मिळण्याच्या आशा संपुष्टात येऊ शकतात. त्यामुळे तुमचा चेक बाऊन्स होणार नाही याची काळजी घ्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here