कोहिमा: राज्याच्या राजकारणात सध्या सर्वत्र कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची चर्चा आहे. कसब्यात भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना आहे. तर चिंचवडमध्ये बंडखोरीमुळे तिरंगी मुकाबला आहे. २८ वर्षांपासून कसबा भाजपला बालेकिल्ला आहे. मात्र यंदा काँग्रेसच्या रविंद्र धंगेकरांनी तिथं कडवं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे भाजपची धाकधूक वाढली आहे. तर दुसऱ्या बाजूला देशातील ३ राज्यांत विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं आहे. नागालँड, त्रिपुरा, मेघालयात उद्या मतमोजणी आहे.

नागालँडमध्ये विधानसभेच्या एकूण ६० जागा आहेत. पैकी ५९ जागांवर सोमवारी मतदान झालं. अकुलुतो विधानसभा मतदारसंघात मतदान झालं नाही. ही जागा भाजपला गेली आहे. विद्यमान आमदार काझेतो किनिमी यांना पुढची टर्म मिळाली आहे. ते दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांची निवड बिनविरोध झाली आहे. त्यांच्याविरोधात केवळ एकच उमेदवार मैदानात होता. काँग्रेसच्या खेकाशे सुमी यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र शुक्रवारी त्यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे निवडणुकीच्या आखाड्यात केवळ किनिमी उरले आणि ते बिनविरोध निवडले गेले.
मुलगा गलवानमध्ये शहीद; वडिलांनी गावात स्मारक उभारलं, पोलिसांनी फरफटत नेलं; प्रकरण काय?
निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा होता. काँग्रेसचे उमेदवार सुमी यांना अचानक त्यांचा अर्ज मागे घेतला. त्यामुळे ६८ वर्षांचे किनिमी विजयी झाले. यानंतर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. काझेतो किनिमी २०१८ मध्ये अकुलुतो विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले. आता त्यांना पुन्हा या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल त्यांनी समर्थक, हितचिंतक, भाजप पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
VIDEO: अरे घाल गोळी! पुतण्यानं डिवचलं, काका पेटला; गोळी घातली, बरोबर नको त्या ठिकाणी लागली
काझेतो किनिमी यांच्या बिनविरोध निवडीमुळे नागालँडमध्ये भाजपनं खातं उघडलं आहे. विशेष म्हणजे मतदानापूर्वीच भाजपनं एक जागा जिंकली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप विधिमंडळ पक्षाचे गटनेते यानथुंगो पेटन यांनी किनिमी यांचं अभिनंदन केलं आहे. भाजपनं नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टीसोबत ही निवडणूक लढवली. एनडीपीपीनं ४०, तर भाजपनं २० जागा लढवल्या. २०१८ मध्येही दोन्ही पक्षांनी अशाच पद्धतीनं जागावाटप केलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here