सातारा: साताऱ्यात नात्यातील प्रेमप्रकरणामुळे एका नवविवाहितेला आपला जीव गमवावा लागला आहे. तिच्याच मावस भावाने तिची अत्यंत निर्दयीपणे हत्या केली. यावेळी ही नवविवाहिता अडीच महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती आता पुढे आली आहे. त्यामुळे या दोघांच्या प्रेमप्रकरणात एका निष्पाव जीवाने जन्माला येण्यापूर्वीच जगाचा निरोप घेतला आहे. नवविवाहितेची हत्या केल्यानंतर त्याने स्वत: देखील आयुष्य संपवलं. सध्या या प्रकरणामुळे तीन कुटुंबं शोकसागरात बुडाली आहेत.

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वांझोळी गावात ही घटना घडली होती. स्नेहल वैभव माळी (वय २२, रा. शामगाव, ता. कराड) असं नवविवाहितेचे नाव आहे. तर दत्तात्रय सुरेश माळी (वय २७, रा. वांझोळी, ता. खटाव) असं गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या प्रियकराचे नाव आहे.

तुझा खेळ खल्लास, आता तू तर मेलीस! शाळेसमोरच विद्यार्थिनीला रोड रोडियोनं गाठलं अन्…

नेमकं काय घडलं?

दत्तात्रय माळी आणि स्नेहल हे मावस भाऊ-बहीण होते. त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, दोन महिन्यांपूर्वी स्नेहलचा शामगाव येथील एका तरुणाची लग्न लावून देण्यात आलं. लग्नानंतर स्नेहलने दत्तात्रयचा मोबाइल नंबर ब्लॉक केला होता. त्यामुळे तो अस्वस्थ झाला होता. ती कधी माहेरी येते याची वाट तो बघत होता. ती २५ फेब्रुवारीला माहेरी आले. स्नेहल माहेरी आल्यानंतर सुरुवातीला दत्तात्रय तिच्याशी गोड बोलल्याने तिला त्याच्या मनसुब्याचा अंदाज आला नाही.

मावस बहिणीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या दत्तात्रयने मात्र तिला संपविण्याची पुरती तयारी केली होती. एकाच गावात राहणाऱ्या या दोघांच्या आईंना याबाबत काहीही कल्पना नव्हती. आपल्या पोरीसोबत असं काही घडेल याचा विराचही स्नेहलच्या आईने केला नसेल. दत्तात्रय आणि स्नेहल या दोघांच्याही आई या सख्ख्या बहिणी आहेत. या दोन्हीही एकाच गावात राहतात.

घटनेवेळी घराच्या कट्ट्यावर सर्वजण बोलत बसले होते. त्यानंतर दत्तात्रय आणि स्नेहल या दोघांच्याही आई गेल्यानंतर दत्तात्रयने स्नेहलला ओढत आत नेले असावे, असा अंदाज आहे. कारण, त्या कट्ट्यावर तिच्या बांगड्या फुटून पडल्या होत्या. विशेष म्हणजे स्नेहल अडीच महिन्यांची गरोदर होती. हे ऐकल्यावरच त्याच्यातील सैतान जागा झाला असावा, असं सांगितलं जात आहे.

भयंकर! बॉयफ्रेंडकडून MMS लीक करण्याची धमकी, तिने चाकू घेतला अन् थेट त्याचं गुप्तांगच छाटलं
दत्तात्रयने क्षणाचाही विचार न करता स्नेहलच्या पोटावर कोयत्याने, चाकूने सपासप असंख्य वार केले. तर, इतर ठिकाणीही वार केल्यामुळे तिच्या पोटातील बाळासह दोन जीवांचा अंत झाला. त्यानंतर त्याने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली.

काही महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या स्नेहलने आपल्या नवीन संसाराची स्वप्ने उराशी बाळगली होती. पण, माहेरी आलेल्या स्नेहलला किंचितशीही कल्पना नसेल की पुन्हा आपण सासरी जाणार नाही. दत्तात्रयने स्नेहलला जीवे मारण्याचा अगोदरच डोक्यात कट शिजत होता. त्यासाठी त्याने चाकू आणि कोयता खरेदी करून ठेवला होता. तर पँटच्या खिशात चाकू ठेवण्यासाठी जागा करून ठेवली होती. कदाचित ती गरोदर असल्याचे त्याला आवडले नसावे. पण, या जगात येण्याअगोदर कोवळ्या जीवालाही ही दुनिया पाहता आली नाही. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे व सर्व पोलिस पथक जेव्हा घटनास्थळी पोहोचले. तेव्हा हे हृदयद्रावक दृश्य पाहून सारेच अवाक झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here