student death in karad koyna river, आदल्या दिवशी निरोप समारंभ झाला, दुसऱ्या दिवशी पोहायला गेला; मात्र पुन्हा परतलाच नाही… – 10th student dies after drowning in koyna river in satara karad
सातारा : दहावीच्या विद्यार्थ्याचा कोयना नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कराडमध्ये घडली आहे. शनिवारी दहावीचा निरोप समारंभ झाला आणि रविवारी राहुलने कायमचा निरोप घेतला. मंगळवारी सायंकाळी कोयना पुलाखाली नदीपात्रात त्याचा मृतदेह सापडला. राहुल परिहार असे बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. राहुल हा कराड आगाशिवनगरचा रहिवासी होता. तीन दिवसानंतर जुना कोयना नदीपात्रातून राहुलचा मृतदेह बाहेर काढण्यास यश आलं आहे. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगाशिवनगर येथे राहणारा राहुल गणेश परिहार हा मलकापूर कराडच्या आनंदराव चव्हाण विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत होता. राहुल रविवारी दुपारी कोयना नदी पात्रात पोहण्यासाठी गेला होता. मात्र, पोहताना तो बुडाला. यावेळी नदीत पोहणाऱ्या इतर मुलांनी राहुल बुडत असल्याचे पाहिले. त्यांनी तात्काळ त्याच्या घरी जाऊन राहुल बुडाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना दिली.