अहमदनगर : आईसह दोन मुलींनी केलेल्या आत्महत्येमुळे अकोले तालुका हादरला आहे. मन्याळे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. सुनिता जाधव (वय ४८), प्राजक्ता जाधव (वय २२) आणि शितल जाधव (वय १८) अशी मृतांची नावे आहेत. घडलेल्या प्रकारामुळे गावात शोककळा परसली असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील मन्याळे गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. मुलींची आई सुनिता जाधव यांनी गळफास घेत आत्महत्या केली. तर त्यांच्या मुली प्राजक्ता जाधव आणि शितल जाधव या दोघींनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. आईने आत्महत्या केल्यानंतर मुलींनी देखील आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या तिघींचेही मृतदेह सध्या अकोले ग्रामीण रुग्णालयात आहेत. पोलीस तपासानंतर आत्महत्येचे कारण स्पष्ट होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तिघीच्या आत्महत्येमुळे मन्याळे गावावर शोककळा पसरली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here