नागपूर : मार्च महिन्यात नागपुरात दोन दिवसीय G-20 आंतरराष्ट्रीय परिषदेची बैठक होणार आहे. परिषदेचा एक भाग म्हणून नागपुरात C20 सिव्हिक सोसायटीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या सभेच्या आयोजनाबाबत प्रशासनातील विविध घटकांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या असून सुरक्षेची जबाबदारी पोलिसांकडे असणार आहे.

या बैठकीत सहभागी होण्यासाठी G-20 देशांचे अनेक प्रतिनिधी उपराजधानी गाठतील आणि बैठकीसोबत अनेक तात्विक ठिकाणांनाही भेट देतील. त्यासाठी शहर नववधूप्रमाणे सजवण्यात येत आहे. रस्ते चकाचक करण्यात येत आहेत.नवीन झाडे लावली जात असून रस्त्यांच्या दुतर्फा रंगरंगोटी करण्यात येत आहे. शहराचा सुशोभीकरणासाठी लाखो रुपये खर्च करण्यात येत आहेत. दरम्यान, शहरातील मुख्य रस्त्यांवर तळ ठोकून बसलेल्या भिकाऱ्यांना हटवण्याची तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

टीम इंडियाने विचार देखील केला नव्हता त्यांच्या सोबत असं काही होईल; चेंडू फक्त वळत नव्हता तर…
भिकाऱ्यांना कोठून हटवले जाईल, हे निश्चित झाले नसले तरी, यासंदर्भात नागपूर महापालिकेशी समन्वय साधून कारवाई केली जाईल, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले. शहरातून भिकाऱ्यांना हटवण्याबाबत महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनाही विचारणा करण्यात आली होती, मात्र याप्रकरणी महापालिकेला कारवाई करण्याचा अधिकार नसल्याचे सांगत त्यांनी हे प्रकरण पोलिसांच्या खांद्यावर टाकले. नागपूर महापालिकेला भिकाऱ्यांना अन्न देण्याचा ना नियम आहे, ना अधिकार असल्याचेही महापालिका आयुक्तांनी सांगितले. रात्रीच्या निवाऱ्यात फक्त विश्रांतीची व्यवस्था महापालिका करू शकते. तेही ६० वर्षांवरील लोकांसाठी. आयुक्त म्हणाले की, ६० वर्षांपेक्षा कमी वयाची व्यक्ती स्वत: भीक मागून कमावते आणि खाऊ शकते.

भारताकडून फक्त कपिल देव अशी कामगिरी करू शकले; आता जडेजाने इतिहास घडवला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध…
जी-20 साठी शहरात ज्या प्रकारे तयारी सुरू आहे आणि बंदोबस्त लावण्यात येत आहे. त्यानुसार शहरातील रस्त्यांवर बेफिकीरपणे भटकणाऱ्या भिकाऱ्यांना हटवले जाणार हे निश्चित.. त्यांच्यासाठी काय व्यवस्था केले जाईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या बैठकीसाठी पालिकेकडून रोषणाई, शिल्पकला, लॅन्ड स्केपिंग सारख्या सजावटी करण्यात येत आहेत. पण आता परदेशी पाहुण्यांना भिकारी दिसू नयेत यासाठी त्यांनाच हटवण्याची तयारी सुरू आहे. ही बैठक २१ आणि २२ मार्च रोजी होत आहे. यासाठी २०० हून अधिक प्रतिनिधी शहरात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here