आसिफ असे या विकृत आरोपीचे नाव असून आसिफ हा फटाक्यांचा व्यवसाय करतो. दिवाळीत तो इमारतीत राहणाऱ्या मुलांना फटाके आणून वाटत असे म्हणून त्याला सर्व मुलांनी फटाकेवाले अंकल नाव ठेवले होते. मुलांना खाली फेकल्या प्रकरणी जखमी मुलीच्या आईने मुंब्रा पोलीस ठाण्यात मुलीच्या जबाबाच्या साहाय्याने आसिफविरुद्ध तक्रार दाखल केली आहे..
या तक्रारीत फिर्यादी आईने आपल्या तक्रारीत नोंद केले आहे की, आसिफ हा रागीट आहे. तो कधी कधी मुलांवर रागवयाचा आणि कधी कधी ओरडून बोलायचा. तसेच, त्याला मूलबाळ नसल्याने त्यांनी आपल्या मुलांना त्याच्यापासून लांब राहण्यास सांगितले होते. काही लोकांसोबत असिफचे भांडण होते आणि त्याच भांडणातून आसिफ याचा आमच्या कुटुंबियांवर राग होता त्यामुळे त्याने हे प्रकारे कृत्य केले असावे, असा आरोप फिर्यादी आईने केला आहे.
या प्रकरणी आरोपीला कडक शिक्षा व्हावी आणि त्याला अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मयत चिमुरड्याच्या घरच्यांनी केली होती. त्यासाठी ४ वर्षीय चिमुरड्याचा मृतदेह हा पोलीस ठाण्यात आणून ठिय्या देखील मांडला होता. त्यावेळी पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्यात असल्याचे आश्वासन चिमुरड्याच्या नातेवाईकांना दिले होते. त्यानंतर पोलिसांनी दोन दिवसांनंतर २७ फेब्रुवारीला जखमी चिमुरडीच्या जबाब नोंदवल्यानंतर असिफ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला आणि त्याला अटक केली. त्याने हे कृत्य का केले, दोन चिमुकल्यांना दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकण्याचा त्याचा उद्देश काय होता, हे मात्र पोलीस तपासात निष्पन्न होईल. पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.