मुंबई: देशातील सर्वाधिक बाधित रुग्ण असल्याचं लेबल लागलेलं शहर या महासंकटातून सावरताना दिसत आहे. आजवर अनेक संकटे झेलणाऱ्या मुंबई शहराने करोना विरुद्धची अशक्यप्राय लढाईही जिंकण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांतील मुंबईतील करोनाची आकडेवारी पाहिल्यास तसे स्पष्टच संकेत मिळत आहेत. मुंबईतील नवीन करोना बाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने खाली येत आहे. ( )

वाचा:

मुंबई महापालिकेने आज सायंकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत मुंबईत करोनाचे ६८९ नवीन रुग्ण आढळले आहेत तर तुलनेत ११०० करोना बाधित रुग्णांनी करोनाला मात देत डिस्चार्ज मिळवला आहे. मुंबईतील करोना बाधितांची एकूण संख्या १ लाख १२ हजार २८७ इतकी झाली असून त्यातील ८७ हजार ७४ रुग्णांनी आतापर्यंत करोना विरुद्धची लढाई जिंकली आहे. सध्या मुंबईत अॅक्टिव्ह म्हणजेच प्रत्यक्ष उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या २० हजार ५६९ इतकी आहे. मुंबईत आज करोना सदृष्य लक्षणे असलेले ७८७ रुग्ण आढळले असून अशा रुग्णांची संख्या आता ८० हजार ७२६ इतकी झाली आहे.

वाचा:

२४ तासांत ५३ जण दगावले

मुंबईतील मृत्यूदर अजूनही मोठा आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत करोनाचे ५३ रुग्ण दगावले असून मृतांचा एकूण आकडा ६ हजार ३५० इतका झाला आहे. आज मृत पावलेल्या ५३ रुग्णांपैकी ४५ रुग्ण अन्य व्याधींनी ग्रस्त होते. मृतांमध्ये ३६ पुरुष व १७ महिलांचा समावेश आहे. ६० वर्षांवरील ४० जणांचा मृत्यू झाला असून ३ जण ४० वर्षांखालील व १० जण ४० ते ६० वर्षे वयोगटातील होते.

वाचा:

७६ टक्क्यांवर

मुबंईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate ) वाढत चालले आहे. सध्याचा रिकव्हरी रेट ७६ टक्के इतका असून रुग्ण दुपटीचा कालावधी ७६ दिवसांवर गेला आहे. २४ ते ३० जुलै या कालावधीत रुग्णवाढीचा सरासरी वेग ०.९२ टक्के इतका राहिला. मुंबईत आतापर्यंत ५ लाख २६ हजार ९८२ इतक्या चाचण्या करण्यात आला आहेत. गेल्या काही दिवसांतील आकडेवारी पाहिल्यास मुंबईतील करोनाचा प्रादुर्भाव वेगाने कमी होत असून उपचार घेत असलेल्या रुग्णांचे प्रमाणही खाली येत आहे. आरोग्य यंत्रणेकडून नियोजनबद्धरित्या चाललेल्या उपाययोजनामुळेच हे शुभसंकेत दिसू लागले आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here