दरम्यान बोरीअडगाव- आंबेटाकळी रोडवर त्यांच्या दुचाकीला विटांची वाहतूक करणान्या भरधाव वेगातील ट्रक (क्र. एमएच ०४ एफयु ९१७७) ने जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील चौघे गंभीररित्या जखमी झाले. यामुळे त्यांना प्रथम खामगाव व नंतर अकोला येथील रुग्णालयात नेण्यात आले.
अपघातातील गंभीर जखमी जवान श्रीकांत सुरवाडे, चार वर्षांचा चिमुकला हार्दिक रोहित वानखडे व कल्पना सुरवाडे या तिघांचा अकोला येथे मृत्यू झाला तर मुलाची आई पूजा वानखडे यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेने बोरीअडगाव येथे हळहळ व्यक्त होत आहे.
अपघातानंतर ट्रक चालक शेख सलीम शेख गफ्फार (वय २६ वर्ष, रा. लाखनवाडा) हा फरार झाला होता. मात्र ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध भादंवि कलम २७९, ३०४(अ), ३३८, ४२७ भादंवि सहकलम १३४ मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा ट्रॅक्टर पलटी, २५ ते ३० विद्यार्थी गंभीर जखमी