घरात अठराविश्व दारिद्र्य आणि रुग्णासोबत कुणीही नाही. अशात तिला रक्ताची आणि तेही दुर्मिळ रक्तगटाची गरज पडली. तेव्हा रुग्णालय प्रशासनापुढे प्रश्न पडला इतक्या रात्री कुणाशी संपर्क साधावा. तेव्हा कॉंग्रेस पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्याशी रात्री दीड वाजताच्या सुमारास रुग्णालयाकडून संपर्क करण्यात आला. सोमवंशी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने रुग्णालयात धाव घेतली. सोमवंशी यांनी कुठलाही वेळ न दवडता, तात्काळ त्यांच्या संपर्कातील एक-एक कार्यकर्त्याशी संपर्क करण्यात सुरुवात केली.
या दरम्यान सामाजिक कार्यकर्ते सुनील माळी यांचा रक्तगट ओ निगेटीव्ह असल्याचं समोर आलं, त्यांना सोमवंशींनी तात्काळ रुग्णालयात बोलावून घेतलं, रात्री दोन वाजताची वेळ होती, सोमवंशी यांच्या शब्दाला मान देत, महिलेचा जीव वाचविण्यासाठी कुठलीही पर्वा न करता सामाजिक कार्यकर्ते सुनिल माळी हे गाढ झोपेत असताना उठून आले आणि त्यांनी रक्तदान केले.
वेळेवर रक्त मिळाल्यामुळे डॉ वैभव सुर्यवंशी हे छाया गायकवाड यांचे प्राण वाचवू शकले. त्यानंतर प्रसुती होऊन छाया गायकवाड यांनी बाळाला जन्म दिला. यावेळी सचिन पाटील, ललित पाटील, शुभम मराठे उपस्थित होते. दुसर्या दिवशी छाया गायकवाड यांच्या नातेवाईकांनी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्यासह रक्तदाता सुनील माळी यांची भेट घेऊन आभार मानले.
जर वेळेवर छाया गायकवाड यांना रक्त मिळाले नसते, तर अनर्थ ओढवू शकला असता, मात्र सुनील माळी हे रक्तदाता म्हणून देवदूत बनून आले. सुनील माळी यांनी रक्तदानातून इतरांसमोर मोठा आदर्श ठेवला असून जगात माणुसकी हाच मोठा धर्म असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.
ना जात, ना धर्म, ना कुंडली ना संपत्ती; उर्वरित आयुष्यासाठी आजी-आजोबांनी बांधली लग्नगाठ!