हिंगोली – हिंगोली जिल्ह्यातील चोंढीफाटा ते औंढा मार्गावर पोलिस भरतीसाठी धावण्याचा सराव करणाऱ्या तरुणीला कारने पाठीमागून धडक दिली. या अपघातामध्ये तरुणी १० ते १२ फूट उंच उडून खाली पडली अन् तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी ता. २ मार्च रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. कन्याकुमारी कृष्णा भोसले (वय १९ वर्ष, आंबा, ता. वसमत) असे तरुणीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील आंबा येथील कन्याकुमारी भोसले व तिच्या दोन मैत्रिणी चोंढी फाटा ते औंढा मार्गावर धावण्याचा सराव करीत होत्या. यावेळी दोन मैत्रिणी पुढे धावत होत्या तर कन्याकुमारी मागे होती. यावेळी एका पेट्रोल पंपाजवळ पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने कन्याकुमारीला जोरदार धडक दिली.

सहा महिन्याआधी मारहाण, आता खून; हिंगोलीत अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं
या धडकेमुळे ती सुमारे १० ते १२ फुट उंच उडाली अन् रस्त्यावर कोसळली. या अपघातानंतर कार चालकाने कार थांबवून तिला पाहिले, मात्र तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने कारसह पलायन केले. सदर प्रकार परिसरातील आखाड्यावर असलेल्या एका शेतकऱ्याने पाहिला. त्याने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

बाळूमामाच्या दर्शनाहून परतताना साताऱ्याजवळ अपघात, पुण्यातील मायलेकाचा जागीच मृत्यू
समोर धावणाऱ्या मैत्रिणींना जोरात ओरडल्याचा आवाज आल्यामुळे त्यांनी मागे पाहिले असता कन्याकुमारी रस्त्यावर पडलेली दिसून आली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, जमादार बालाजी जोगदंड, विनायक जानकर, ज्ञानेश्‍वर ठोंबरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन कन्याकुमारी यांचा मृतदेह वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे.

थोडक्यात बचावलो,गाडी दरीत गेली असती; घाटात एसटीचा ब्रेक फेल, ४० प्रवासी बसलेले, चालक ठरला देवदूत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here