जिल्हाप्रमुख सरप यांच्या निवासस्थानी बाजोरिया समर्थक उपजिल्हाप्रमुख योगेश बुंदेले, प्रकाश पाटील यांच्यासह पाच जणांकडून तोडफोड करण्यात आल्याचा आरोप सरप यांनी केला आहे. यावेळी सरप यांनाही धक्काबुक्की झाल्याचा आरोप होतोय. सरप यांच्या दिवाणखान्यात बाजोरिया समर्थकांनी तोडफोड केल्याचा आरोप सरप कुटूंबियांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी खदान पोलिसांनी सरप कुटूंबियांचा जवाब नोंदविलाय. मात्र, यात अद्यापही गुन्हे दाखल झाले नाहीय असे समजते.
शिंदे गटातील नेमका वाद काय ?
पक्षाचे माजी संपर्कप्रमुख आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यावर गंभीर आरोप पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून झाले. दरम्यान शिंदे गटाचे नेते खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे बाजोरियांची लेखी तक्रार करण्यात आली. बाजोरियांचा तक्रारीत ‘कमिशन एजंट’ असा उल्लेख करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी दिलेला १५ कोटी आणि २० कोटींचा विकासनिधी बाजोरिया यांनी ठाकरे गट आणि राष्ट्रवादीला विकल्याचा गंभीर आरोप या पत्रातून करण्यात आला.
दरम्यान आगामी महापालिका, नगर पालिका निवडणुका लक्षात घेऊन पदाधिकारी निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र आता निधीवरूनच शिंदे गटात वाद सुरू झाला आहे. मुख्यमंत्र्यांना ११ फेब्रुवारीला बाळासाहेबांची शिवसेना अकोल्याचे जिल्हाध्यक्ष अश्विन नवले, महानगराध्यक्ष योगेश अग्रवाल, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष निखिल ठाकूर, मुरलीधर सटाले, नितीन मानकर, शशिकांत चोपडेंसहसह १३ पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी असलेले तक्रारीचं पत्रच पाठविले.
नेमकं पदाधिकाऱ्यांनी काय म्हटलं होतं पत्रात?
बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे शिंदे गटाचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार गोपिकिशन बाजोरीया यांच्यावर विकास निधीचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप पत्रातून करण्यात आला. विरोधी गटातील लोकांकडून कमिशन घेऊन त्यांची कामे निधीत घेतली. पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता त्यांची कामे रद्द केली. तसेच त्यांची पडित मालमत्ता असलेल्या ठिकाणी नवीन प्रोजेक्टला चालना मिळावी, यासाठी नाल्यांची कामे टाकण्यात आली. याची भनकही पदाधिकाऱ्यांना लागली नाही. हे सर्व प्रकार बाजोरीया यांच्यामार्फत सुरू असून, स्वार्थासाठी ते कोणत्या थराला गेले आहेत हे यावरून लक्षात येते. विकास निधीची मलई खाण्यातच ते गुंग आहेत. दरम्यान स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये रोष पसरला असून, बाजोरिया यांनी २० कोटी रुपये निधीसाठी दिलेल्या पत्राची शहानिशा करावी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच निधी वितरित करावा, अशी मागणीही या पदाधिकाऱ्यांनी पत्रातून केली आहे.
भाजपच्या माजी नगरसेवकाकडून नागरिकांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप