मात्र, तब्बल एक महिन्याच्या घसरणीनंतर अदानी समूहाचे शेअर्स तेजीने कामकाज करत आहे. दरम्यान, आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात अदानी समूहाच्या समभागांची कामगिरी कशी झाली ते जाणून घेऊया.
अदानी एंटरप्रायझेसची गती कायम
अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा शेअर गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात १.०९ टक्के किंवा १७.१० रुपयांनी वाढून १५८१.६५ रुपयांवर व्यवहार करत होता. लक्षात घ्या की शेअर आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात १५०१ रुपयांच्या घसरणीसह खुला झाला होता. पण नंतर स्टॉकने गती पकडली आणि शेअर पुन्हा हिरव्या रंगात परतला. अशाप्रकारे बीएसईवर कंपनीचे मार्केट कॅप १,८०,५७० कोटी रुपये झाले आहे.
अदानी पोर्टमध्येही उसळी
गुरुवारी सुरुवातीच्या व्यापारात अदानी पोर्ट्सचा स्टॉक ०.९९% किंवा ५.९५ रुपयांनी वाढून ६०८.१० रुपयांवर होता तर, शेअरने आज ६०२.१५ रुपयांपासून सुरुवात केली.
अप्पर सर्किट शेअर्स कोणते
गुरुवारच्या सत्रात अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन, आणि अदानी ग्रीनच्या शेअरमध्येही अप्पर सर्किट लागले आहे. अदानी पॉवरचा शेअर ५ टक्के किंवा ७.६५ रुपयांनी वाढून १६१.४० रुपयांवर पोहोचला आहे. तर अदानी ट्रान्समिशनचा शेअरही पाच टक्क्यांनी वाढून ७०८.३५ रुपये, अदानी ग्रीनचा शेअर ५३५.२५ रुपयांवर पोहोचला आहे.
सिमेंट कंपन्यांची स्थिती
अदानी समूहाची सिमेंट कंपनी ACC सिमेंटचा शेअर गुरुवारी किंचित घसरून १७६०.०५ रुपये प्रति शेअरवर खुला झाला, पण सुरुवातीनंत आता मोठ्या वाढीसह १७८२ रुपयावर व्यवहार करत आहे. तसेच अंबुजा सिमेंटचा शेअर गुरुवारी सकाळी वाढीसह ३५४.४० रुपयांवर उघडला असून सुरुवातीच्या व्यापारात १.६६ टक्के किंवा ५.८५ रुपयांनी वाढून ३५९.२५ रुपयेवर व्यवहार करत होता.