जळगाव : जळगाव शहरातील उस्मानियॉ पार्क येथील विवाहितेने पतीसह सासरच्या मंडळीच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी ७ वाजता समोर आली आहे. सना तौसीफ मिस्तरी (वय-२१ वर्ष, रा. उस्मानियॉ पार्क, शिवाजी नगर, जळगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी मयत सना हिच्या वडिलांच्या तक्रारीवरुन तिच्या पतीसह सासरच्यातीन जणांविरोधात शहर पोलिसात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील माहेर असलेले सना हिचा विवाह गेल्या वर्षी जळगावातील शिवाजी नगरातील उस्मानिया पार्क येथील तौफिस मिस्तरी याच्याशी झाला होता. तौफिक हा मिस्तरी काम करतो. पती तसेच सासू आणि सासरे यांच्यासह सना उस्मानिया पार्क येथे भाडे करारावर असलेल्या घरात वास्तव्याला होती.

गेल्या दोन महिन्यांपासून सना हिच्या घरात कौटुंबिक वाद सुरू होतो. घरात होत असलेल्या कौटुंबिक वादासंदर्भात सना हिने तिचे वडील मजीद शेख सांडू यांना सांगितलेले होते. चार दिवसांपूर्वीच सनाने आपल्या आईवडीलांशी फोनवर बोलणे झाले होते. मंगळवारी मध्यरात्री सर्वजण झोपलेले असताना सना हिने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. सकाळी सात वाजता पतीसह सासरची मंडळी उठल्यावर त्यांना सना ही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठले, तसेच पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.

सना हिच्या आत्महत्येची बातमी कळाल्यावर सनाच्या आई वडिलांसह इतर नातेवाईकांनी जळगावकडे धाव घेतली. पतीसह सासरच्या मंडळींच्या त्रासातून मुलीने आत्महत्या केली असा आरोप विवाहितेचे वडील मजीद शेख सांडू व आई शबाना मजीद शेख सांडू यांनी पत्रकारांशी बोलतांना केला आहे. सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी मुलीकडील नातेवाईकांनी केली. यावेळी जिल्हा रुग्णालयात मयत सना हिच्या माहेरकडील नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.

झोपेत अंदाज चुकला, गच्चीवरुन थेट खाली पडून तरुणाचा मृत्यू, नातवाला पाहून आजीचा आक्रोश
अडीच लाख अन् सोन्याची अंगठीसाठी सासरच्यांकडून छळ

मयत सना हिचे वडील मजित शेख सांडू (वय ४१ वर्ष) यांनी सनाच्या पतीसह सासरच्याविरोधात शहर पोलिसात तक्रार दिली आहे. घर ताबे गहाण ठेवण्यासाठी सना हिने तिच्या माहेरुन आई वडिलांकडून दोन लाख ५० हजार रुपये आणावेत तसेच सोन्याची अंगठी आणावी अशी मागणी सना हिच्याकडून तीचे पती तसेच सासरच्या मंडळींनी केली, याच कारणावरुन पतीने व सासू तसेच सासऱ्याने सना हिला वेळावेळी शिवीगाळ तसेच मारहाण करत शारीरिक व मानसिक त्रास दिला, तसेच घरातून काढून देऊ अशी धमकी दिली. या जाचाला कंटाळून सना हिने आत्महत्या केली असे तक्रारीत नमूद आहे.

नाशकात माजी सैनिकाचा खून करुन गाडी पेटवली, ६ महिन्यांनी गूढ उकललं, अंगावर काटा आणणारं कारण
या तक्रारीनुसार बुधवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यात सना हिचे पती तौसीफ शेख कमालोदिन शेख, सासू शबानाबी कमालोदीन शेख, सासरे कमालोदिन शेख तिघे रा. बिलाल मज्जीत तांबापुरा या तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय पोटे हे करीत आहेत.

तुला जे करायचे ते कर, किशोरी पेडणेकर ठाकरेंचं ब्रँड आहे ते मिटणार नाही; किरीट सोमय्यांना प्रत्युत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here