२५ वर्षांची लिला ओमेगा हेल्थकेअर मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये एक्झिक्युटिव्ह असिस्टंट म्हणून कार्यकत होती. २०१७ पासून तिचे दिनकरशी प्रेमसंबंध होते. लिला कॉलेजमध्ये दिनकरला सिनीयर होती. हे दोघेही मूळचे आंध्रप्रदेशचे आहेत. २८ वर्षांच्या दिनकर बनालानं लिलाची तिच्या ऑफिसबाहेर हत्या केली. लिलानं दिनकरचा मोबाईल नंबर ब्लॉक केला होता. व्हॉट्स अपवरही दिनकरला ब्लॉक केलं होतं.
लिला आणि दिनकरचे ५ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यांनी लग्न करायचं ठरवलं. लिलानं कुटुंबीयांना दिनकरबद्दल सांगितलं. दिनकर वेगळ्या जातीचा असल्यानं तिच्या कुटुंबानं नकार दर्शवला. त्यामुळे लिलानं दिनकरशी बोलणं बंद केलं. ‘लिलावर तिच्या आईचा खूप प्रभाव होता. तिच्यामुळेच लिलानं माझ्याशी बोलणं टाकलं’, असं दिनकरनं पोलिसांना सांगितलं.
दिनकरला लिलाशी बोलायचं होतं. लिला ऐकली तर ठीक, अन्यथा तिला तिथेच संपवायचं या हेतूनं दिनकर चाकू घेऊन लिलाला भेटायला गेला. लिलानं लग्नाला नकार दिल्यास तिचा खून करायचा ही बाब त्यानं मनाशी पक्की केली होती. ऑफिसमधून निघालेल्या लिलाला दिनकरनं गाठलं. तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ती ऐकली नाही. तेव्हा दिनकरनं लिलाला भररस्त्यात १७ वेळा चाकूनं भोसकलं. जे बी नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दिनकरला अटक केली. लिलाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.