बंगळुरू: कर्नाटक पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागानं (सीआयडी) एकाला अटक केली आहे. कोल्ह्याचं पिल्लू पाळल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. लक्ष्मीकांत असं आरोपीचं नाव असून तो तुमकुरु जिल्ह्यातील नागवेली गावचा रहिवासी आहे.

४२ वर्षांचे लक्ष्मीकांत पोल्ट्री फार्म चालवतात. या फार्ममध्ये गेल्या सात महिन्यांपासून त्यांनी कोल्ह्याचं पिल्लू पाळलं होतं. एका पिंजऱ्यात त्यांनी पिल्लाला बंदिस्त करुन ठेवलं होतं. या प्रकरणात लक्ष्मीकांतला अटक करण्यात आली. वन्य प्राण्याला पकडून ठेवल्याची माहिती सीआयडीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या खात्रीशीर माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी पोल्ट्री फार्मवर छापा टाकला.
पाच वर्षे प्रेमसंबंध, तिनं घरी सांगितलं, कुटुंबाचा नकार; तरुण संतापला, ऑफिसबाहेर १० वेळा…
सात महिन्यांपूर्वी कोल्ह्याचं पिल्लू पकडलं. त्यावेळी ते फार लहान होतं, असं लक्ष्मीकांतनं पोलिसांना सांगितलं. कोल्ह्याचं पिल्लू लकी ठरेल. त्यामुळे भरभराट होईल असं वाटलं. म्हणून पिल्लू पाळलं असं आरोपी म्हणाला. पोलिसांनी लक्ष्मीकांतला अटक करून त्याला १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं.

लक्ष्मीकांतच्या पोल्ट्री फार्ममधील पिंजऱ्यात असलेला कोल्हा तंदुरुस्त आहे. त्याला वन विभागाच्या तुमकूर झोनच्या ताब्यात देण्यात आलं आहे. वन विभाग कोल्ह्याला जंगलात सोडेल. कर्नाटकच्या काही भागांमध्ये कोल्ह्याची पूजा केली जाते. अनेक वर्षांपासून ही परंपरा आहे. कोल्हा लकी असतो असा काही समुदायांचा समज आहे.
ऑफिसचं काम आटपून बॅडमिंटन कोर्टवर; खेळता खेळता कोसळले, निपचित पडले; फिटनेस फ्रीकची अखेर
भारतात तीन प्रकारचे कोल्हे आढळतात. भारतीय, तिबेटियन आणि लाल कोल्हे भारतात आढळून येतात. यातील भारतीय कोल्ह्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यांना बंगाली कोल्हे म्हणूनही ओळखलं जातं. कोल्ह्यांची शिकार करणं आणि त्यांना पाळणं हा गुन्हा असून त्यासाठी शिक्षा होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here