२६ जानेवारीच्या रात्री रामहेत दारुच्या नशेत झोपला होता. हीच संधी साधून रिनानं प्रियकर सूरजला घरी बोलावलं. सूरज छतावरून घरात शिरला. दोघांनी मिळून रामहेतची गळा दाबून हत्या केली. यानंतर त्याचा मृतदेह घरामागे असलेल्या मोहरीच्या शेतात फेकला. शेताच्या मधोमध खड्डा खणून रामहेतचा मृतदेह तिथे गाडण्यात आला.
रामहेत कामाच्या निमित्तानं दोन-तीन दिवस बाहेर गेल्याचं रिनानं सासरच्यांना सांगितलं. रामहेतच्या वडील आणि भावानं त्याच्या मोबाईलवर कॉल केला. तो रिनाचा प्रियकर सूरजनं उचलला. सूरजनं कॉल घेतल्यानं रामहेतच्या कुटुंबीयांनी शंका आली. त्यांनी पोलीस ठाण्यात रामहेत बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. रिना आणि सूरज यांचे प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सूरजला ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी केली. तेव्हा प्रकरणाचं गूढ उकललं. यानंतर पोलीस सूरज आणि रिनाला घेऊन शेतात पोहोचले. मोहरीच्या शेतात गाडण्यात आलेला मृतदेह बाहेर काढला. सूरज आणि रिनाला हत्या प्रकरणात अटक केली. सूरजचं वय २० वर्षे असून रिनाला ३ मुलं आहेत.