Authored by पवन येवले | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 2 Mar 2023, 3:43 pm

Nashik News : नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात एक अतिशय दु:खद घटना घडली आहे. दहावीच्या दोन विद्यार्थ्यांचं अपघाती निधन झालं आहे. दहावीचा पेपरला जाताना एका भरधाव ट्रकने चिरडल्याने दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

 

Nashik Devlali Students Death in Accident
पेपरला जाताना काळाचा घाला, भरधाव ट्रकची ॲक्टिव्हाला धडक; दोघांचा जागीच मृत्यू; संपूर्ण गाव स्तब्ध

हायलाइट्स:

  • पेपरला जाताना दोन विद्यार्थ्यांना ट्रकने चिरडलं
  • ट्रकने चिरडल्यानं दोघांचा जागीच मृत्यू
  • नाशिक देवळाली कॅम्प परिसरातील घटना
नाशिक : नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात एक दुःखद घटना घडली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला आहे. दहावीचा पेपर देण्यासाठी जात असताना दोघं विद्यार्थ्यांना एका ट्रकने चिरडल्याने दोघांचाही जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर तालुक्यातील आगस्टखिंड येथील रहिवासी असलेले शुभम रामदास बरकले (वय १४) आणि दर्शन शांताराम आरोटे (वय १४) हे दोन मित्र पांढुर्ली येथील जनता विद्यालय येथे आज गुरुवार रोजी इयत्ता दहावीचा पेपर देण्यासाठी आपल्या अॅक्टिव्हा या दुचाकीवरून जात होते. आगस्टखिंड येथे भरधाव वेगात येणाऱ्या एच पी गॅसच्या ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. आज दहावी बोर्डाचा पहिलाच पेपर असून पेपर देण्यासाठी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे.
कसब्यात भाजपचा पराभव कुठल्या कारणाने झाला? उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया देत थेट सांगितलं
दरम्यान, सिन्नर तालुक्यातील आगस्टखिंड येथील विद्यार्थी पेपर देण्यासाठी पांढुर्ली येथील शाळेत जात होते. परंतु त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. या घटनेमुळे आगस्टखिंड परिसरातील ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली असून दोन्ही दहावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

बारक्या-बारक्या लेकरांचं कुठं मनावर घ्यायचं, नितेश राणेंना पुन्हा सुषमा अंधारेंनी डिवचलं

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here