अमरावती : नातेसंबंध, मैत्री यांमध्ये समाजमाध्यमांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. समाजमाध्यमांमुळे अनेक जण एकमेकांच्या जवळ आले आहेत. तसेच या समाजमाध्यमांमुळे अनेक भयंकर घटनांमुळे अनेक नाती दुरावत असल्याचा सुद्धा प्रत्यय येत आहे. अशीच एक भयंकर घटना अमरावती जिल्ह्यात घडली. घटस्फोटीत पतीने पत्नीला पुन्हा स्वीकार करण्यासाठी हात पुढे केला, मात्र प्रामाणिक पत्नीने नकार दिला. यावर क्रूर बुद्धीच्या या पतीने कुठलाही विचार न करता थेट आपल्या पत्नीचे बनावट फेसबुक अकाउंट तयार केले आणि त्यातूनच वैवाहिक जीवनातील खाजगी क्षणाची व्हिडिओ त्यांनी नातेवाईकासोबत शेअर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पतीने विभक्त राहणाऱ्या पत्नीच्या नावे फेसबुकवर फेक अकाउंट उघडले. त्यावर पत्नीचा फोटो व आक्षेपार्ह मजकूर अपलोड करून बदनामी करण्यात आली. ही धक्कादायक घटना दत्तापूर ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी आग्रा येथे राहणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाऊदसारख्या दहशतवाद्यांना मारण्यासाठी शस्त्र तयार, अमेरिकेने बनवले खतरनाक तंत्रज्ञान, चाचणी सुरू
पीडित महिलेच्या पतीला दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत तो त्यांच्यासह मुलांना मारहाण करीत होता. त्यामुळे पीडित महिला ही पतीला सोडून माहेरी आई-वडिलांकडे राहायला आली. गेल्या पाच वर्षांपासून ती आई- वडिलांकडे वास्तव्यास आहे. या काळात पतीने त्यांच्या नावाने फेसबुकवर फेक अकाउंट उघडले. त्यानंतर या अकाउंटवरून पीडित महिलेच्या नातेवाईक व मित्रांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविण्यात आल्या. नातेवाईक व मित्रांसोबत घाणेरड्या शब्दात बोलून त्यांना अश्लील व्हिडीओ पाठविण्यात आले.

जीवघेणी ठरतेय ही नशा; पोलादपूरमध्ये ५५ वर्षीय व्यक्तीने संपवले जीवन, अशा घटना का वाढत आहेत
हा प्रकार पीडित महिलेच्या चुलत भावाच्या लक्षात आल्यावर त्यांनी जावयाला मोबाइलवर कॉल करून याबाबत जाब विचारला. त्यावर त्यांना शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर चुलत भावाने याबाबत पीडित महिलेला अवगत केले. त्यामुळे पीडित महिलेने फेसबुकवर पाहणी केल्यावर त्यांना स्वतःच्या नावाने असलेल्या फेक अकाउंटवर स्वतःचा फोटो व अश्लील भाषेतील पोस्ट दिसून आल्या. त्यावर अनेकांनी केलेल्या कमेंट्सही त्यांना दिसल्या. या प्रकाराने पीडित महिलेची बदनामी झाली. त्यामुळे त्यांनी पतीला मोबाइलवर कॉल करून याबाबत जाब विचारला. त्यावर पतीने त्यांना धमकी दिली.

या प्रकरणी पीडित महिलेने दत्तापूर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ठाकरे सरकार फडणवीसांना अटक करणार होते, त्या योजनेचा मी साक्षीदार; एकनाथ शिंदेंचा खळबळजनक दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here