पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक घोषित झाल्यापासून जोरदार राजकारण रंगलं. भाजपने दोन्ही निवडणुका बिनविरोध करण्यासाठी सुरवातीला प्रयत्न केला. पण विरोधी पक्षांनी म्हणजेच महाविकास आघाडीतील ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्पष्ट नकार दिल्याने निवडणूक रंगली. या निवडणुकीत प्रमुख लढत ही भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होती. पण या निवडणुकीत चर्चेत होते अभिजीत बिचुकले आणि आनंद दवे.

कसब्याच्या पोटनिवडणुकीचा निकाल हाती आला आहे. महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या मैदानात असलेले काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी बाजी मारली आहे. धंगेकर यांना ७३१९४ मितं मिळाली आहेत. भाजपचे हेमंत रासने यांना ६२२४४ मतं मिळाली. या निकालात आणखी एक उत्सुकता होती ती म्हणजे अभिजित बिचुकले आणि ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांना पडलेल्या मतांची.

पोटनिवडणुकीत अभिजीत बिचुकले यांना एकूण ४७ मतं मिळाली आहेत. बिचुकले हे मतांचं अर्धशतकही पूर्ण करू शकले नाहीत. आनंद दवे यांना मात्र बिचुकलेंपेक्षा जरा ‘जास्त’ मतं मिळाली आहेत. आनंद दवे स्थानिक असल्याने त्यांना २९६ मतं मिळाली. विशेष बाब म्हणजे या दोघांपेक्षा जास्तं मतं नोटाला पडली आहे. १३९७ मतदारांनी नोटाला मत दिलं आहे.

कसब्यातील विजयाचं श्रेय कुणाचं? चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं खरं कारण
कसबा पोटनिवडणुकीतील विजयानंतर भाजपची प्रतिक्रिया आली आहे. भाजपने हा पराभव मान्य केला आहे. पण या विजयाचं श्रेय हे भाजपने वीरेंद्र धंगेकर यांना दिलं आहे. कसबा पेठ निवडणुकीतून भाजपची मस्ती उतरवली गेली, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

कसब्यात भाजपचा पराभव कुठल्या कारणाने झाला? उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया देत थेट सांगितलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here