तसेच “कसबा मतदारसंघात पैसे वाटपाचा व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाला होता. मात्र, सुसंस्कृत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार झालेल्या मराठी माणसाने सध्याच्या दडपशाहीला आणि पैसे वाटण्याच्या संस्कृतीच्या विरोधातील हा एल्गार आहे”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. सुळे या आज इंदापूरमध्ये आल्या होत्या त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
“जर मताचे विभाजन झाले तरच भारतीय जनता पार्टी निवडून येते. चिंचवडमधील भाजपची आघाडी ही त्यामुळेचं आहे. सर्वसामान्य जनता ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान करते. हे पक्षाच्या विरोधात नसून त्यांनी राबवलेली धोरणे, महागाई याच्या विरोधातील जनतेचा हा कल आहे”, असेही सुळे यावेळी म्हणाल्या
“देश हा संविधानाप्रमाणे चालला पाहिजे तो हुकूमशाहीने चालता कामा नये. पारदर्शक कारभार आणि संविधानाच्या चौकटीतून निवडणुका झाल्या पाहिजेत”, अशी प्रतिक्रिया देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.