हैदराबाद: अकरावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यानं वर्गात आत्महत्या केली आहे. खासगी कनिष्ठ महाविद्यालयात त्यानं आयुष्याची अखेर केली. मानसिक त्रासाला कंटाळून हा निर्णय घेत असल्याचं त्यानं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केलं. आत्महत्येला चार जण जबाबदार असल्याचा उल्लेख विद्यार्थ्यानं केला आहे. संस्थेच्या व्यवस्थापनाकडून दिल्या जाणाऱ्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपवत असल्याचं त्यानं चिठ्ठीत म्हटलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे.

मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास १६ वर्षीय विद्यार्थ्यानं आत्महत्या केली. संध्याकाळी सुरू झालेलं लेक्चर रात्री साडे दहा वाजता संपलं. त्यानंतर विद्यार्थ्यानं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती नरसिंगीचे पोलीस निरीक्षक व्ही. शिवा कुमार यांनी सांगितलं. कार्यवाहक प्राचार्य आणि तीन प्राध्यापक आपल्या मृत्यूला जबाबदार असल्याचं विद्यार्थ्यानं चिठ्ठीत लिहिलं आहे.
लकी ठरेल म्हणून कोंबडीवाल्यानं कोल्हा पाळला, पिंजऱ्यात कोंडला; नशीब उघडलं नाही, घडलं भलतंच
विद्यार्थ्यानं साडे दहाच्या सुमारास आत्महत्या केली. याची माहिती पोलिसांना पावणे अकराच्या सुमारास मिळाली. इतर विद्यार्थ्यांनी त्याला रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. यानंतर विद्यार्थ्याचा मृतदेह बुधवारी ओस्मानिया रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. कार्यवाहक प्राचार्य आणि अन्य तीन प्राध्यापक देत असलेला त्रास असह्य होत असल्यानं टोकाचं पाऊल उचलल्याचं विद्यार्थ्यानं चिठ्ठीत नमूद केलं आहे.

‘मी तुम्हाला वेदना देतोय त्याबद्दल सॉरी. पण मी हा त्रास आणखी सहन करू शकत नाही. विद्यार्थ्यांना नरक दाखवणाऱ्या या चौघा प्राध्यापकांना सोडू नका,’ असं विद्यार्थ्यानं चिठ्ठीत नमूद केलं आहे. यानंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांना मारणाऱ्या प्राध्यापकाला ताब्यात घेतलं. चिठ्ठीत नावं असलेल्या अन्य तिघांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
कॉलेजात प्रेम जुळलं, भररस्त्यात संपवलं; बॉडीजवळ बसून राहिला; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
प्राध्यापक मारहाण करत असल्याच्या तक्रारी पालकांनी पोलसांकडे केल्या आहेत. मारहाणीचे दोन व्हिडीओ पोलिसांना मिळाले आहेत. ‘माझ्या मुलाला कोणताही मानसिक त्रास नव्हता. महाविद्यालयातील प्राध्यापकांमुळे त्यानं जीव दिला,’ असा आरोप मृताच्या आईनं केला. या प्रकरणी पोलिसांनी चार प्राध्यापक आणि महाविद्यालय व्यवस्थापनाविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here